Mumbai Fraud News: 'प्रधानमंत्री मुद्रा लोन' देण्याच्या नावाखाली फसवणूक; अंधेरी पोलिसांकडून १० जणांना अटक

Andheri Cyber Crime Branch: प्रधानमंत्री मुद्रा लोन देण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा अंधेरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अंधेरी पोलिसांच्या सायबर विभागाने या प्रकरणी पनवेलमधून १० जणांना अटक केली आहे.
Andheri Cyber Crime Branch
Andheri Cyber Crime BranchSaamtv

संजय गडदे, मुंबई|ता. २७ जानेवारी २०२४

Mumbai Crime News:

प्रधानमंत्री मुद्रा लोन देण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा अंधेरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अंधेरी पोलिसांच्या सायबर विभागाने या प्रकरणी पनवेलमधून १० जणांना अटक केली आहे. या टोळीने आत्तापर्यंत ५००- ६०० जणांची फसवणूक केल्याची शक्यता वर्तवली जात असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबईच्या अंधेरी पोलिसांच्या सायबर विभागाने प्रधानमंत्री मुद्रा लोन देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी अंधेरी पोलिसांच्या सायबर विभागाने पनवेल येथून या प्रकरणात दहा जणांना अटक केली आहे. या टोळीकडून सोशल मिडीया माध्यम फेसबुकवर मुद्रा लोन संदर्भात जाहिरात करून संपर्क केलेल्या तब्बल 500 ते 600 नागरिकांची या प्रकरणात फसवणूक झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या आरोपींविरोधात मुंबईत सात आणि संपूर्ण देशभरात 45 ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. अटक केल्यानंतर त्यांच्याकडून तब्बल 58 लाख 16 हजार 480 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सध्या आरोपी अंधेरी पोलिसांच्या ताब्यात असून आरोपींनी अजून कोणाची फसवणूक केली आहे का याचा देखील पोलीस तपास करत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Andheri Cyber Crime Branch
Ram Temple in Dhule: धुळ्यात अयोध्येतील राम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती; धुळेकरांकडून अयोध्येचा अनुभव घेण्यासाठी हजारोंची गर्दी

कुविख्यात चैन स्नॅचर अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

दरम्यान, मागील 10 वर्षात मध्यप्रदेशमध्ये अनेक जबरी चोरीचे गुन्हे दाखल असलेल्या कुविख्यात अंतरराज्यीय "चैन स्नॅचर टोळीतील चार जणांना अकोला स्थानिक गुन्हे शाखेने इंदौर येथून अटक केली आहे. या चारही आरोपींवर अनेक ठिकाणी चैन स्नॅचिंगचे गुन्हे तसेच अकोला, अमरावती, मलकापुर, मुक्ताईनगर, भुसावळ येथे याच महिन्यात वाहन चोरी, जबरी चोरीचे गुन्हेही दाखल होते. (Latest Marathi News)

Andheri Cyber Crime Branch
OBC Reservation: आरक्षणाच्या आडून नक्की काय सुरू आहे? बारा बलुतेदारांनी का नाकारलं ओबीसी बैठकीचं निमंत्रण? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com