Mumbai Metro 13 Approved: Mira Bhayandar To Vasai-Virar Project AI Image
मुंबई/पुणे

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

Mumbai Metro 13 Project Mira Bhayandar to Vasai Virar : मुंबई मेट्रो-१३ प्रकल्पाला मंजुरी; मिरा भाईंदर ते वसई-विरार २५.०३ किमी मार्गावर १६ स्थानके उभारली जाणार.

Alisha Khedekar

  • मेट्रो-१३ प्रकल्पाला मंजुरी

  • मिरा भाईंदर ते वसई-विरार जोडले जाणार

  • वसई खाडीवर मेट्रो आणि सहा पदरी रस्त्याचा संयुक्त पूल उभारला जाणार

  • मेट्रो-१३ मुळे मिरा रोड, वसई, नालासोपारा, नायगाव आणि विरारची कनेक्टिव्हिटी वाढणार

गणेश कवडे, साम प्रतिनिधी

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबईतील वाहतुकीला चालना देण्यासाठी नव्या मेट्रो-१३ प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मेट्रो मार्ग क्रमांक १३ (मिरा भाईंदर ते वसई-विरार) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. यासोबतच पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे रिंगरोडच्या सोरतापवाडी ते वरवे-शिवरे मार्गालाही मान्यता देण्यात आली.

किती स्थानकांचा समावेश असणार?

या प्रकल्पासाठी सुमारे १७,७२४.९९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मेट्रो मार्गाची एकूण लांबी २५.०३ किलोमीटर असून, त्यातील २१.७८ किलोमीटर मार्ग उन्नत आणि ३.२५ किलोमीटर मार्ग भूमिगत असेल. या मार्गावर एकूण १६ स्थानके असतील. त्यापैकी १३ उन्नत, तर तीन भूमिगत स्थानके असणार आहेत. मिरा रोड, वसई, नालासोपारा, नायगाव आणि विरार परिसर या मेट्रोमुळे जोडले जाणार आहेत.

सहा पदरी रस्ता बांधण्यात येणार

या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे वसई खाडीवरील पांजू बेटाला जोडणारा सुमारे ४.९२ किलोमीटर लांबीचा सहा पदरी रस्ता आणि मेट्रोचा संयुक्त पूल उभारण्यात येणार आहे. चिखल डोंगरी येथे मेट्रो डेपो प्रस्तावित आहे. मेट्रो-१३ नायगाव, नालासोपारा आणि विरार रेल्वे स्थानकांना जोडणार असून, नेताजी सुभाषचंद्र बोस स्टेडियम येथे मेट्रो मार्ग क्रमांक ९ शी जोडणी प्रस्तावित आहे. सर्व स्थानकांवर बससेवा उपलब्ध करून देण्याचेही नियोजन आहे.

प्रवासाचा वेळ वाचणार

प्रकल्पासाठी सुमारे २४.८४ हेक्टर भूसंपादन आवश्यक असून, मंजुरीनंतर पाच वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पुढील सहा महिन्यांत भूसंपादन आणि पोहोच मार्ग तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. २०३१ पर्यंत या मेट्रो मार्गावर दररोज सुमारे ४.४९ लाख प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज आहे. मेट्रोमुळे रस्ते प्रवासाचा वेळ जवळपास ५० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. तसेच खासगी वाहनांचा वापर, राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा ताण आणि कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होणार आहे. वसई-विरार, मिरा-भाईंदर आणि मुंबई उपनगरांतील औद्योगिक व लॉजिस्टिक केंद्रांशी संपर्कही अधिक सुलभ होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे सेवा विस्कळीत

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

SCROLL FOR NEXT