Mumbai Mega Block on Sunday 31 December 2023  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Mega Block: मुंबईकरांनो, थर्डी फर्स्टसाठी घराबाहेर पडताय? रविवारी रेल्वेच्या 'या' मार्गावर मेगाब्लॉक

Mumbai Train Update News (31 December 2023): मुंबईकरांनो, थर्टी फर्स्ट निमित्त घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे.

Satish Daud

Mumbai Train Mega Block (31 Dec 2023)

मुंबईकरांनो, थर्टी फर्स्ट निमित्त घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण उद्या म्हणजेच रविवारी ३१ डिसेंबर मध्य रेल्वेने मेगाब्लॉक जाहीर केला आहे. हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गांवरील विविध कामांच्या दुरुस्तीसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावं, असं आवाहन रेल्वेच्या वतीने करण्यात आलं आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी ११:०५ ते दुपारी ३:५५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

ब्लॉकदरम्यान, सीएसएमटी येथून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकलसेवा डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. डाउन जलद मार्गावरील ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल सीएसएमटीहून सकाळी १०:२० वाजता सुटणारी बदलापूर लोकल असेल.

ब्लॉकनंतरची बदलापूरसाठी पहिली लोकल दुपारी ३:३० वाजता सुटेल. रविवारी हार्बर लाईनवर देखील मेगाब्लॉक घेण्यात येईल. सकाळी १०:३३ ते दुपारी ३:४९ पर्यंत हा मेगाब्लॉक असेल. ब्लॉकदरम्यान पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणारी लोकलसेवा बंद राहतील. तर ठाण्याकडे जाणाऱ्या काही लोकल देखील रद्द करण्यात आल्या आहेत.

ब्लॉकपूर्वीची CSMT येथून पनवेलकडे जाणारी शेवटची लोकल सकाळी ९:३० वाजता सुटेल. तर पनवेलकडून CSMT कडे जाणारी शेवटची लोकल १०.१७ वाजता असेल. ब्लॉकनंतरची पहिली लोकली CSMT येथून ३:१६ वाजता असेल. तर पनवेल येथून सुटणाऱ्या पहिल्या लोकलची वेळ ४:१० वाजता असेल.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते वाशी मार्गावर विशेष लोकल धावतील. तसेच ब्लॉक कालावधीत ठाणे ते वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असतील. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि खारकोपर स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parbhani Crime : परभणीत खळबळ; मध्यवस्तीत आढळला महिलेचा मृतदेह, घातपात झाल्याचा संशय

Shocking News: नूडल्स खाणाऱ्यांनो सावधान! पाकिटामध्ये आढळली मेलेली पाल; VIDEO व्हायरल

Pune Kharadi Rave Party: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांकडून मोठी चूक; कोर्टात उघडकीस आला प्रकार

Ladki Bahin Yojana : लाडकीचे किती अर्ज आले? किती अपात्र? दर महिन्याला किती पैसे लागतात?

Maharashtra Politics: रामदास कदमांचे भाऊ सदानंद कदमांनी घेतली अनिल परबांची भेट, राजकीय चर्चांना उधाण|VIDEO

SCROLL FOR NEXT