मुंबई महापालिकेचं महापौरपद महिलांसाठी राखीव
भाजपकडे सर्वाधिक ८९ नगरसेवक
महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्याने महापौर भाजपचाच होणार
भाजपच्या ६ महिला नगरसेविका महापौरपदाच्या शर्यतीत
राज्यातील २९ महानगर पालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली. देशातील सर्वात श्रीमंत समजल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेचा महापौर कोण होणार याकडे संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे. मुंबई महानगर पालिकेचे महापौर पद हे खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. म्हणजे मुंबई महानगर पालिकेवर महिलाराज पाहायला मिळणार आहे. खुल्या प्रवर्गातील महिला मुंबईची महापौर होणार आहे.
मुंबई महानगर पालिकेवर महायुतीचा महापौर विराजमान होणार आहे. मुंबई महानगर पालिका निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाले. शिवसेना- भाजप या दोन्ही पक्षाचे एकूण ११८ नगरसेवक विजयी झाले. यामध्ये एकट्या भाजपचे ८९ नगरसेवक आहेत. बहुमताचा आकडा ११४ आहे. भाजप आणि शिंदेसेना बहुमताचा आकडा पार करत आहेत. सर्वात जास्त नगरसेवक भाजपकडे असल्यामुळे मुंबईचा महापौर हा भाजपचाच होणार असल्याचे निश्चित झाले आहे. या महापौर पदाच्या शर्यतीमध्ये भाजपकडून ६ महिला नगरसेविकांची नावं चर्चेत आहेत. यामध्ये कोणकोण आहे हे आपण पाहणार आहोत...
राजश्री शिरोडकर या अभ्यासू आहेत. दादर-माहिम मतदारसंघातून त्या येतात. शिरोडकर चौथ्यांदा नगरसेविका झाल्या आहेत.
अलका केळकर भाजपच्या जेष्ठ नेत्या आहेत. या मुंबईच्या उपमहापौर राहिलेल्या आहेत. ही त्यांची नगरसेविकेची चौथी टर्म आहे.
रितू तावडे दुसऱ्यांदा नगरसेविका झाल्या आहेत. त्यांच्याकडे महिला मोर्चाचे पद देखील आहे.
हर्षिता नार्वेकर या दक्षिण मुंबईतून येतात. त्या दुसऱ्यांदा नगसेविका झाल्या आहेत.
आशा मराठे या भाजपच्या नेत्या आहेत. त्या तिसऱ्यांदा नगरसेविका झाल्या आहेत.
शितल गंभीर दादर भागातून विजयी झाल्या आहेत. त्या दुसऱ्यांदा नगरसेविका झाल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.