Pune Mayor: पुण्यात भाजप महापौरपदासाठी कुणाला संधी देणार? या १० नावांची चर्चा

BJP Mayor Race In Pune Municipal Corporation: पुणे महानगर पालिका निवडणुकीमध्ये भाजपला सर्वाधिक यश मिळाले. भाजपचे सर्वात जास्त नगरसेवक निवडून आले. त्यामुळे पुण्यात भाजपचा महापौर होणार आहे. या शर्यतीत १० जणांची नावं आहेत.
Pune Mayor: पुण्यात भाजप महापौरपदासाठी कुणाला संधी देणार? या १० नावांची चर्चा
BJP Mayor Race In Pune Municipal CorporationSaam Tv
Published On

Summary -

  • पुणे महापालिका निवडणुकीत भाजपला प्रचंड बहुमत मिळाले

  • ११९ नगरसेवकांसह भाजपला एकहाती सत्ता मिळवण्यात यश आले

  • उद्या महापौर पदासाठी आरक्षण सोडत निघणार आहे

  • महापौरपदासाठी भाजपच्या १० नगरसेवकांची नावं चर्चेत

२९ महापालिकांच्या निवडणुका संपल्या आणि निकाल देखील लागला. आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे ते महापौर कोण होणार याकडे. सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेले राजकीय पक्ष आपला महापौर व्हावा यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. त्यासाठी बहुमताचा आकडा पूर्ण व्हावा यासाठी जुळवाजुळवी सुरू आहे. या महापौरपदाच्या निवडीदरम्यान राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. पुण्यात सर्वात जास्त नगरसेवक निवडून आलेल्या भाजपचा महौपर होणार हे निश्चत आहे. पण महापौर कोण असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुणे महानगर पालिका महापौर पदासाठी उद्या आरक्षण सोडत निघणार आहे. महापालिका निवडणुकीत पुण्यात भाजपला घवघवीत यश मिळाले. पुणे महापालिका निवडणुकीत भाजपचा ११९ जागांवर विजय मिळवण्यात यश आले. पुणे महापालिकेतील एकूण १६५ नगरसेवांपैकी ११९ नगरसेवक हे एकट्या भाजपचे आहेत. त्यामुळे महापौर हा भाजपचा होणार आहे. या महापौर पदाच्या शर्यतीमध्ये भाजपचे १० नगरसेवकांची नावं चर्चेत आहेत. यामध्ये कोण-कोण आहे ते आपण पाहणार आहोत...

Pune Mayor: पुण्यात भाजप महापौरपदासाठी कुणाला संधी देणार? या १० नावांची चर्चा
Pune Municipal Corporation: मुंबईनंतर पुणे महापालिकेतही 'स्वीकृत' नगरसेवकपदाचे वेध; भाजपमध्ये जोरदार लॉबिंग सुरू

पुण्यातील भाजपचे संभाव्य महापौरपदासाठी नावं -

धीरज घाटे -

पुणे शहर भाजपाचे शहराध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले धीरज घाटे यांनी प्रभाग २७ मधून भाजपचे थेट पॅनल निवडून आणलं

श्रीनाथ भिमाले -

विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्यानंतर सुद्धा प्रभाग २१ मुकुंद नगर सॉलिसबरी पार्क मधून श्रीनाथ भिमाले यांनी महापालिका निवडणूक लढवून विजय मिळवला

राजेंद्र शिळीमकर -

भाजप चे निष्ठावान म्हणून ओळख असलेल्या राजेंद्र शिळीमकर यांनी प्रभाग २० मधून पुणे महापालिकेच्या निवडणुकीत यश मिळवलं

गणेश बिडकर -

भाजपकडून पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी बिडकर यांची महानगर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पक्षाची प्रचार रणनीती, पक्षाचा सर्व्हे, तिकीट वाटपाची जबाबदारी यापासून प्रभाग २४ मधून निवडणूक लढवण्यापर्यंत गणेश बिडकर यांना सर्वच ठिकाणी यश आलं

मानसी देशपांडे -

भाजप च्या मानसी देशपांडे या आमदार आणि मंत्री माधुरी मिसाळ यांच्या निकटवर्तीय आहेत. प्रभाग २० मधून मानसी देशपांडे यांनी सलग चौथ्यांदा महापालिकेच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे.

Pune Mayor: पुण्यात भाजप महापौरपदासाठी कुणाला संधी देणार? या १० नावांची चर्चा
Pune: महिला रुग्णाचा मृतदेह अचानक गायब, रुबी हॉल क्लिनिकमधील धक्कादायक प्रकार; पुण्यात खळबळ

मंजुषा नागपुरे -

पुणे शहरातील प्रभाग क्रमांक ३५ मधून मंजुषा नागपुरे यांची बिनविरोध निवडणूक झाली आणि महापौर पदाच्या रेस मध्ये त्यांनी त्यांच्या नावाची जागा आघाडीवर आणली

वर्षा तापकीर -

सलग तीन वेळ पुणे महापालिकेच्या सभागृहात नगरसेवकाची भूमिका मांडणाऱ्या वर्षा तापकीर यांनी यावेळी सुद्धा प्रभाग ३७ मधून निवडणूक लढवत भाजपचा झेंडा फडकवला

रोहिणी चिमटे -

महापालिका आरक्षणाची सोडत एस टी म्हणजेच अनुसूचित जमातीचे निघाले तर भाजपच्या रोहिणी चिमटे यांचं नाव महापौर पदासाठी आघाडीवर असणार आहे. पुण्यातील प्रभाग ९ मधून चिमटे यांनी विजय मिळवला

किरण दगडे पाटील -

पुण्यातील प्रभाग १० बावधन भुसारी कॉलनी मधून भाजप समोर अजित पवारांच्या राष्ट्रवादी चे आव्हान होतं मात्र हे आव्हान मोडत किरण दगडे पाटील यांनी तिसऱ्यांदा नगरसेवक पद भूषवलं

दिलीप वेडेपाटील -

प्रभाग १० म्हणून आणखी एक उमेदवार महापौर पदाच्या शर्यतीत आहेत ते म्हणजे दिलीप वेडे पाटील. भाजप मध्ये एक ज्येष्ठ नेता म्हणून त्यांची ओळख आहे.

Pune Mayor: पुण्यात भाजप महापौरपदासाठी कुणाला संधी देणार? या १० नावांची चर्चा
Pune Accident : दीड वर्षापूर्वी लग्न, आता अपघातात मृत्यू, पुण्यात एसटी बसने उड्डाणपूलावर राजाला उडवले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com