Pune Municipal Corporation: मुंबईनंतर पुणे महापालिकेतही 'स्वीकृत' नगरसेवकपदाचे वेध; भाजपमध्ये जोरदार लॉबिंग सुरू

Nominated Corporator: मुंबईनंतर पुण्यात नामांकित नगरसेवक पदांसाठी राजकीय हालचाली तीव्र झाल्या आहेत. महापालिकेतील नियुक्त्या समोर येताच भाजप इच्छुकांकडून जोरदार लॉबिंग सुरू झाली आहे.
Nominated Corporator
Political activity intensifies outside Pune Municipal Corporation as parties lobby for nominated corporator positions.
Published On
Summary
  • महापालिका निवडणुकांनंतर स्वीकृत नगरसेवकपदासाठी हालचाली

  • मुंबईनंतर पुण्यातही इच्छुकांमध्ये उत्सुकता

  • भाजपमध्ये स्वीकृत पदांसाठी जोरदार लॉबिंग

राज्यातील महानगरपालिका निवडणुका पार पडल्यानंतर आता नामनिर्देशित (स्वीकृत) नगरसेवक पदांसाठी राजकीय हालचालींना वेग आलाय. नगरसेवकांच्या नियुक्तीसाठी इच्छुकांनी आपापल्या पक्षश्रेष्ठींकडे जोरदार लॉबिंग सुरू केली आहे. मुंबई महापालिकेनंतर आता पुण्यातही उमेदवारी नाकारलेल्या इच्छुकांना आता स्वीकृत नगरसेवकपदाचे वेध लागले आहे. दरम्यान स्वीकृत नगरसेवकपदाची कमाल संख्या दहापर्यंत वाढविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दरम्यान स्वीकृत नगरसेवक म्हणजे काय हेही जाणून घेऊ.

Nominated Corporator
Pune Traffic Alert: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, आज वाहतुकीत मोठ्या प्रमाणात बदल, वाचा पर्यायी मार्ग

प्रचारादरम्यान अनेक इच्छुकांना स्वीकृत नगरसेवकपदी संधी देण्याचे सूतोवाच भाजपकडून करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर या इच्छुकांकडून आता स्वीकृत नगरसेवकपदी संधी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहे. अनेकजण आपल्या नावाचा, प्रतिष्ठेचा वापर करत पक्षात जोरदार लॉबिंग करत आहेत. महापालिकेच्या सध्याच्या रचनेत स्वीकृत नगरसेवकांची संख्या पाच आहे. ही संख्या वाढवण्यात येणार असल्याची सुरू झालीय. राज्य सरकारकडून अध्यादेश प्रसिद्ध झाल्यानंतर स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

Nominated Corporator
Shiv Sena-MNS Seat Sharing: पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेना-मनसे किती जागा लढवणार? फॉर्म्युल्याची आतली बातमी फुटली

स्वीकृत नगरसेवक म्हणजे काय?

स्वीकृत नगरसेवक महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतील एक विशेष सदस्य असतो. त्याची निवड थेट जनतेतून होत नसते. शहराच्या विकासासाठी विविध क्षेत्रांतील अनुभवी, कार्यकुशल आणि तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश करण्याच्या उद्देशाने ही पदे निर्माण केली गेली आहेत.

Nominated Corporator
Shocking! पुण्यात महिला कार चालकाचं भयानक कृत्य; तरुणाला 2 किलोमीटर फरपटत नेलं|Video

पात्रता आणि क्षेत्र

खालील क्षेत्रांतील मान्यवरांचा स्वीकृत नगरसेवक म्हणून समावेश अपेक्षित असतो—

प्रशासन व कायदा: अनुभवी शासकीय अधिकारी, न्याय व कायदा क्षेत्रातील तज्ज्ञ

आरोग्य व शिक्षण: नामांकित डॉक्टर, शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य

तांत्रिक व सामाजिक क्षेत्र: अभियंते, सामाजिक कार्यकर्ते, शहर विकासातील तज्ज्ञ. या तज्ज्ञांचा उपयोग शिक्षण, आरोग्य, अभियांत्रिकी आणि इतर महत्त्वाच्या समित्यांमध्ये धोरणात्मक निर्णयांसाठी केला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com