परळ–भोईवाडा परिसरातील महापालिकेची प्राथमिक शाळा एसआरए प्रकल्पानंतर प्रत्यक्षात गायब झाली.
२००९ मध्ये शाळेला नव्या इमारतीत जागा देण्याचे आश्वासन दिले.
इमारती उभ्या राहिल्या पण शाळेसाठी राखीव जागा दिली गेली नाही.
शाळा एसआरए संकुलातील केवळ तीन खोल्यांमध्ये हलवली; आज तिथे एकही विद्यार्थी शिल्लक नाही.
Why Marathi school disappeared in Mumbai SRA project : तुम्ही राज्यात घोडा, गाडी, दागिने आणि विविध वस्तू चोरीला गेल्याच्या तक्रारी ऐकल्या असतील. शाळा चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली आहे. मराठी शाळांचे अस्तित्व धोक्यात आल्याची आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. नेमका काय आहे हा प्रकार? जाणून घेऊया...
“मुंबईत मराठी भाषेच्या नावाने सत्ताधारी व विरोधकांमध्ये राजकारण सुरु असताना मुंबई महापालिकेची परळ भोईवाडा परिसरातील महापालिकेची ‘२ ऑक्टोबर वसाहत किडवाई रोड प्राथमिक शाळा’ अदृश्य झाल्याची धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे. 2009 साली या भागात एसआरए प्रकल्प राबवण्यात आला होता. त्यावेळी शाळेला नव्या इमारतीत जागा देण्याचे स्पष्ट आश्वासन देण्यात आले. मात्र इमारती उभ्या राहिल्या, महानगरपालिकेची NOC मिळाली, घरे विक्रीला गेली… पण शाळेसाठी राखीव जागा मात्र प्रत्यक्षात दिलीच गेली नाही.
“ज्यावेळी ही जागा 2009 मध्ये पुनर्वसनासाठी गेली, तेव्हा २ ऑक्टोबर प्राथमिक शाळेत पहिली ते सातवीपर्यंत वर्ग भरायचे… जवळपास २५० विद्यार्थी इथे शिकत होते. पण आज स्थिती अशी की शाळाच नाही, विद्यार्थीच नाहीत… शाळेला आता एसआरए संकुलातील केवळ तीन खोल्यांमध्ये हलवण्यात आलं असून तिथेही एकही विद्यार्थी शिल्लक राहिलेला नाही. संपूर्ण शाळा फक्त भिंतीवर लटकणाऱ्या पोस्टरपुरती मर्यादित झाली आहे.” शाळेतील शिक्षकाला फोनवरून आम्ही संपर्क केला. त्यावेळी शाळेत चार मुलांचे अॅडमिशन झाल्याची माहिती त्यांनी दिली.
एकूणच काय मराठीच्या नावानं राजकारण करणाऱ्या सत्ताधारी आणि विरोधकांच्या मुखात लालफितीचा कारभार चालवणाऱ्या खाबुंनी लगावलेली ही चपराखच आहे. किमान या शाळेसाठी तरी सत्ताधारी व विरोधक एकत्र येऊन स्थानिक विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची मराठी शाळा मिळवून देणार का? हा प्रश्न साम मराठी उपस्थित करत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.