मुंबई : ही बातमी आहे एका चोराची, जो कोट्यावधी रुपयांचा मालक आहे. या चोराचा मुंबईसारख्या शहरात फ्लॅट आहे, बिहारमध्ये चांगलं घर आहे आणि शेतीची जमीन आहे, शिवाय मोठा बँक बॅलन्स आहे. पण हा श्रीमंत चोर त्याच्या चोरीच्या सवयीमुळे त्रस्त होता. हा चोर गुन्हा करण्यासाठी अशा युक्त्या वापरायचा की लोकांना कोणत्याही प्रकारचा संशय येत नासे. पोलिसांना चकवा देण्यासाठी तो महिलांचे कपडे घालून चोरी करायला जायचा. या श्रीमंत चोराने चोरी करण्यासाठी इतर कोणत्या पद्धती वापरल्या आणि तो पोलिसांच्या हाती कसा लागला. ते आता समोर आलंय.
मुंबईतील मालाड पोलिसांनी एका हुशार चोराला अटक केली आहे. जो पोलिसांपासून वाचण्यासाठी महिलेचा वेष घेत असे आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपासून वाचण्यासाठी रेल्वे ट्रॅकचा वापर करत असे. मालाड पोलिसांनी या चोराकडून सोने वितळवण्याचं मशीन, ३६ तोळे सोने-चांदीचे दागिने, महिलांचे कपडे आणि रोख रक्कम जप्त केली आहे. पोलीस तपासात असं दिसून आलं आहे की, आरोपी चोर अनेक बंगले आणि फ्लॅटचा मालक आहे. तो बऱ्याच काळापासून अशा चोरी करत आहे. परंतु आतापर्यंत त्याला पकडण्यात आलेलं नाही. दरम्यान, त्याने आतापर्यंत अशा डझनभर चोऱ्या केल्या आहेत. मालाड पोलिसांनी खूप मेहनत घेतल्यानंतर या चोराला अटक केली आहे.
मालाड विभागाचे एसीपी हेमंत सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, धूर्त आरोपी चोर रणजीत कुमार उपेंद्र उर्फ मुन्ना (वय ४४) हा बाबुगंज बिहारचा रहिवासी आहे. त्याला मालाड मालवणी परिसरातून अटक करण्यात आली आहे. पोलिसांपासून वाचण्यासाठी आरोपी महिलांचा पोशाख घालून चोरी करायचा आणि कधीकधी भिकाऱ्याच्या वेशात रेल्वे ट्रॅकवरून चोरी करायला जायचा. मालाड पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी विजय पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीकडून सुमारे ५७ लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, ज्यामध्ये बँकेत १६ लाखांची रोकड गोठवण्यात आली आहे आणि ४१ लाखांचे दागिने आणि वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. या धूर्त चोराविरुद्ध आतापर्यंत ८ गुन्हे दाखल झाले आहेत. तर त्याला यापूर्वी कुठेही अटक करण्यात आलेली नाही.
मालाड पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी तुषार सुखदेवे, संतोष सातवसे, अमित गावंड, अविनाश जाधव, कॉन्स्टेबल महेश डोईफोडे यांच्या पथकाने रेल्वे ट्रॅकसह इतर ठिकाणच्या १५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केल्यानंतर हा खुलासा केला. पोलिसांना असे अनेक गंभीर खुलासे होण्याची भीती आहे, कारण आरोपी गेल्या १० वर्षांपासून असे असंख्य गुन्हे करत असताना हुशारीने अटकेपासून सुटत आहे आणि कोट्यवधी रुपयांच्या फ्लॅट, जमीन आणि बंगल्यांचा मालक बनला आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्या आणि सावधगिरीने फिरताना दिसणारी व्यक्ती कोणालाही ती महिला असल्याचा भ्रम होऊ शकतो. परंतु सत्य काही वेगळेच निघालं. जेव्हा महिलेचा पोशाख घालून चोरी करणाऱ्या या व्यक्तीला अटक करण्यात आली तेव्हा, या हुशार चोराबद्दल असे काही खुलासे झाले की मुंबई पोलिसांनाही याचं आश्चर्य वाटलं.
खरंतर, हा माणूस सामान्य चोर नाहीये. तो एक श्रीमंत चोर आहे ज्याच्याकडे फ्लॅट, घरे, शेतीची जमीन आणि बँकेत लाखो रुपये जमा आहेत, पण तो मुंबईत चोरी करायचा. तो दिवसा रेकी करायचा आणि रात्री महिलेच्या वेशात चोरी करायचा. पोलिसांपासून वाचण्यासाठी हा चोर महिलांचे कपडे घालायचा आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपासून वाचण्यासाठी तो रेल्वे ट्रॅकवरून जात असे. गुन्ह्याच्या वेळी हा चोर सीसीटीव्हीमध्ये त्याचा चेहरा दिसू नये म्हणून दुपट्ट्याने चेहरा झाकायचा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.