Crime News  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai : शाळा सुटल्यावर घरी जाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर निर्जनस्थळी अत्याचार; फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

Mahim POCSO Case : मुंबईतील माहीम परिसरात अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धमकीप्रकरणी माहीम पोलिसांनी पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

Mumbai Crime News : माहीम परिसरात शाळा सुटल्यानंतर घरी जात असलेल्या एका अल्पवयीन मुलीला बाईकवरून निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, आरोपीने या घटनेचे काही अश्लील फोटो व व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत मुलीला गप्प राहण्यास भाग पाडल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. (Mahim minor girl assault POCSO case)

पीडित मुलगी आपल्या पालकांसोबत माहीम परिसरात राहत असून एका नामांकित शाळेत शिक्षण घेत आहे. १८ जून रोजी नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर ती घरी जात होती. त्यावेळी आरोपी बाईकवरून तिच्याजवळ आला. त्याने मुलीला बाईकवर बसवून एका निर्जनस्थळी नेले. तेथे तिचे हातपाय बांधून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. यावेळी आरोपीने काही फोटो व व्हिडिओही काढले.

त्यानंतर हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी आरोपीने मुलीला दिली. या धमकीमुळे घाबरलेल्या मुलीने काही काळ हा प्रकार कोणालाही सांगितला नाही.

घटनेनंतर मुलगी प्रचंड मानसिक तणावात होती. पालकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी तिची आपुलकीने चौकशी केली. त्यावेळी मुलीने घडलेला संपूर्ण प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर पालकांनी माहीम पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

तक्रारीची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली माहीम पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपीविरुद्ध लैंगिक अत्याचारासह पॉक्सो कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्धची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला पुढील कारवाईसाठी डोंगरी येथील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

दरम्यान, या गुन्ह्यात आणखी एका तरुणाचा सहभाग असल्याचे पोलिस तपासात समोर आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. पीडित मुलगी आणि आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या या घटनेमुळे माहीम परिसरातील नागरिकांमध्ये मोठी संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT