mahamorcha mumbai saamtv
मुंबई/पुणे

MVA Mahamorcha : महाविकास आघाडीच्या महामोर्चाला मोठी गर्दी, 'या' पक्षांचाही पाठिंबा

या महामोर्चाला मुंबईमध्ये आता सुरूवात झाली असून राज्यभरातील लाखो कार्यकर्ते तसेच महाविकास आघाडीतील प्रमूख नेते या मोर्चात सहभागी झाले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai: सत्ताधारी पक्षांकडून वारंवार होणाऱ्या महापुरूषांच्या अपमानाच्या तसेच महागाई आणि बेरोजगारी विरोधात महाविकास आघाडीकडून आयोजित करण्यात आले आहे. या महामोर्चाला मुंबईमध्ये आता सुरूवात झाली असून राज्यभरातील लाखो कार्यकर्ते तसेच महाविकास आघाडीतील प्रमूख नेते या मोर्चात सहभागी झाले आहेत.

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, महाविकास आघाडीकडून मुंबईमध्ये महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. ज्याला नुकतीच सूरूवात झाली आहे. राज्यभरातील लाखो कार्यकर्ते सहभागी झाल्याने मोर्चात मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळेच मोठा पोलिस फौजफाटा या भव्य आणि विराट मोर्चामध्ये आहे. (Mahavikas Aghadi)

या मोर्चामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासोबतच रश्मी ठाकरेंनी उपस्थिती दर्शवली आहे. रश्मी ठाकरेंनी या मोर्चात उपस्थित होत लक्ष वेधले आहे. मोर्चामध्ये आनंद दिघे यांचे नातू केदार दिघेही सहभागी झाले आहेत. तसेच अजित पवार, संजय राऊत, नाना पटोले, हे प्रमुख नेते यामध्ये सहभागी झाले आहेत. तसेच मोर्चामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही सहभागी होणार आहेत. (Shivsena)

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या मोर्चाला संबोधित करणार असून मोर्चात पन्नास खोके एकदम ओके च्या घोषणाही देण्यात येत आहेत. तसेच या मोर्चाला शेतकरी कामगार पक्ष, महाराष्ट्र एकीकरण समिती, डाव्या पक्षांचे नेतेही सहभागी झाले आहेत. दरम्यान, मुंबईच्या भायखळा इथल्या रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनीपासून या महामोर्चाची सुरुवात होईल तर सीएसएमटी स्टेशनच्या समोर टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीच्या इथे हा मोर्चा संपेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gram Panchayat Fund: किती निधी आला? कुठे खर्च केला? ग्रामपंचायतीचा कारभार नागरिकांना थेट मोबाईलवर पाहता येणार

Soft Chapati: तीन पदरी घडीची चपाती कशी करायची? मऊ-लुसलुशीत टम्म चपात्यांसाठी खास टिप्स

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; ठाणे जिल्ह्यातील बडा नेता अजित पवारांच्या गळाला

Maharashtra Live News Update : नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची बदली

Face Care: नॅचरल ग्लोईंग चेहरा हवा असेल; मग रोज रात्री 'या' आइस क्यूबने चेहऱ्याचा मसाज नक्की करा

SCROLL FOR NEXT