mumbai madgaon vande bharat express stops Saam TV
मुंबई/पुणे

Vande Bharat Express: पहिल्याच फेरीत वंदे भारत ट्रेनची लाखोंची कमाई; तिकिटांसाठी मोठी वेटिंग लिस्ट

Vande Bharat Train News: विशेष म्हणजे मुंबई सीएसएमटीवरून निघालेली ट्रेन आपल्या नियोजित वेळेपूर्वीच २४ मिनिटे अगोदरच मडगाव स्थानकांवर पोहोचली असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai Madgaon Vande Bharat Train: मुंबई ते मडगाव ते वंदे भारत एक्स्प्रेससह देशातील ५ एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंगळवारी हिरवा झेंडा दाखवला. मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधानांनी मडगाव-मुंबई वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण केले. आता बुधवारपासून वंदे भारत ट्रेन सर्वसामान्यांच्या सेवेसाठी दाखल झाली असून पहिल्याच फेरीत तब्बल ४७७ प्रवाशांनी ट्रेनमधून प्रवास केला आहे.

बुधवारी वंदे भारत ट्रेनने (Vande Bharat Train) ६.४८ लाखांची कमाई केल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुंबई सीएसएमटीवरून निघालेली ट्रेन आपल्या नियोजित वेळेपूर्वीच २४ मिनिटे अगोदरच मडगाव स्थानकांवर पोहोचली असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.

मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेनची वेळ काय?

भारतीय रेल्वेच्या IRCTC च्या संकेतस्थळानुसार, मुंबई ते मडगाव या दरम्यानची वंदे भारत एक्स्प्रेस आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. मुंबईहून सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी वंदे भारत ट्रेनची सेवा असेल. तर मडगावहून मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीन दिवशी वंदे भारत ट्रेनची सेवा सुरू राहील. हे वेळापत्रक मान्सूनपुरते मर्यादित असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मुंबई-मडगाव भारत ट्रेनचे तिकीटदर किती?

दरम्यान, काही दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनाने मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस तिकीट दर जाहीर केले होते. यामध्ये एसी चेअरसाठी १ हजार १०० रुपये ते १ हजार ६०० रुपये मोजावे लागतील. तर एक्झिक्युटिव्ह चेअरकारसाठी २ हजार ते २ हजार ८०० रुपयांच्या जवळपास राहिल असं प्रशासनाने सांगितलं होतं.

मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसचं वेळ काय?

मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेसला एकूण ८ डब्बे असणार आहेत. ही एक्सप्रेस इतर वंदे भारतप्रमाणे दिवसाच धावणार आहे. शुक्रवारचा अपवाद वगळता आठवड्यातील सर्व दिवस ही वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांच्या सेवेत असणार आहे. ही वंदे भारत एक्सप्रेस सकाळी ५ वाजून २५ मिनिटांनी सीएसएमटी इथून सुटेल. तर गोव्यातील मडगाव इथे दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी पोहचेल.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धायरीचा पोस्टर बॉय! लग्न जुळवण्यासाठी जागोजागी पोलिसांचे बॅनर, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

राज्यात भाजपची मोठी रणनीती; युवकांना जोडण्यासाठी आखला मास्टरप्लान

शेतकरी कर्जमाफी परदेशी समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर; काय असणार कर्जमाफीचे नियम आणि अटी?

युद्ध पुन्हा पेटणार? ट्रम्पची शरणागती अमान्य; इराणनं शस्त्रसंधी फेटाळून लावली

Maharashtra News Live Update: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत माझे चांगले संबंध- खासदार अशोक चव्हाण

SCROLL FOR NEXT