Mumbai Local Train Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Update: मुंबईत पावसाची विश्रांती, तरी लोकलसेवा उशिराने; जाणून घ्या तिन्ही मार्गाचे अपडेट्स

Mumbai Local Delayed: मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गावरील लोकलसेवा उशिराने सुरू असल्यामुळे मुंबईकरांचे हाल होत आहे. प्रत्येक रेल्वे स्थानकांवर आणि लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे.

Priya More

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस (Mumbai Rainfall) पडत होता. या पावसाने आज जरी विश्रांती घेतली असली तरी देखील मुंबईतील लोकलसेवा उशिराने सुरू आहे. तिन्ही रेल्वे मार्गावरील लोकलसेवा उशिराने सुरू असल्यामुळे मुंबईकरांचे हाल होत आहे. प्रत्येक रेल्वे स्थानकांवर आणि लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे आजही मुंबईकरांना कामावर जाण्यासाठी उशिर होऊन लेटमार्क लागण्याची शक्यता आहे.

मुंबईसह उपनगर आणि कल्याण-डोंबिवली, बदलापूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे गुरूवारी लोकलसेवा विस्कळीत झाली होती. मध्य रेल्वे मार्गावर लोकलच्या ६० पेक्षा जास्त फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या आणि लोकल देखील उशिराने सुरू होत्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. गुरूवारी रात्रीपासून मुंबईत पावसाने विश्रांती घेतली. असे असताना देखील मुंबईतील पश्चिम, मध्य आणि हार्बर या तिन्ही मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत झाली आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील लोकलसेवा १० ते १५ मिनिटं उशिराने सुरू आहे. हार्बर रेल्वे मार्गावरील लोकलसेवा ५ ते १० मिनिटं उशिराने सुरू आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकलसेवा ५ ते ७ मिनिटं उशिराने सुरू आहे. लोकलसेवा विस्कळीत झाल्यामुळे कामाला जाणाऱ्या मुंबईकरांचे हाल होत आहे. कामाला जाण्याच्या वेळालाच लोकलसेवा उशिराने सुरू असल्यामुळे मुंबईकरांना त्रास होत आहे. मध्य रेल्वेच्या सर्वच रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे. आजही मुंबईकरांना कामावर पोहचण्यासाठी उशिर होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

युजरच्या 'स्कीम'ची जोरदार चर्चा! 'फॉलो करा अन् मिळवा 1GB, 2GB इंटरनेट पॅक', पठ्ठ्याचे अवघ्या ४ महिन्यातच वाढले 15000 फॉलोवर्स

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

Maharashtra Live News Update: सोशल मीडियावर महिलेची अश्लील छायाचित्र आणि प्रोफाइल बनवणाऱ्या तरुणाला अटक

Horoscope Saturday: या राशींना मिळणार दुप्पट लाभ, हनुमानजी करणार अपार कृपा! वाचा शनिवारचे राशीभविष्य

Nilesh Ghaywal : निलेश घायवळ लंडनला पळाला; पुणे पोलीस आता संपूर्ण टोळीच्या नाड्या आवळणार, पुढचा प्लानही सांगितला

SCROLL FOR NEXT