Heavy Rain Update : महाराष्ट्रासहित गुजरात आणि मध्य प्रदेशला पावसाने झोडपलं; अनेक शहरे पाण्याखाली, शाळांना सुट्टी जाहीर

Heavy Rain Update : महाराष्ट्रासहित गुजरात आणि मध्य प्रदेशला पावसाने झोडपून काढलं आहे. अनेक शहरे पाण्याखाली गेले आहेत. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्रासहित गुजरात आणि मध्य प्रदेशला पावसाने झोडपलं; अनेक शहरे पाण्याखाली, शाळांना सुट्टी जाहीर
Heavy Rain UpdateSaam tv
Published On

नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातील पूरस्थितीचे धक्कादायक फोटो समोर आले आहेत. तिन्ही राज्यातील महत्वाचे शहर पाण्याखाली गेले आहेत. महाराष्ट्रातील पुणे शहराला गुरुवारी पावसाने झोडपून काढलं. दुसरीकडे मध्य प्रदेश आणि गुजरातच्या काही भागातही पूरस्थिती पाहायला मिळाली.

मुसळधार पावसामुळे मध्य प्रदेश आणि गुजरातमधील काही शहरातील सखल भागात पाणी शिरलं. रस्त्यांना नद्याचं स्वरुप आलं. पुण्यातील मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे प्रशासनाने शाळा आणि कॉलेजला सुट्टी जाहीर केली आहे. या पूरस्थितीमुळे सैन्य दलातील जवानांना पूरपरिस्थिती हाताळावी लागत आहे.

महाराष्ट्रासहित गुजरात आणि मध्य प्रदेशला पावसाने झोडपलं; अनेक शहरे पाण्याखाली, शाळांना सुट्टी जाहीर
Bhiwandi Rain : मुसळधार पावसाने भिवंडी शहरात सर्वत्र पाणी; विद्यार्थ्यांना करावी लागतेय कसरत

पुण्यातील पूरस्थितीमुळे खडकवासला धरणातील ४० हजार क्यूसेक पाणी सोडण्यात आलं आहे. धरणातील पाणी सोडण्याआधी अलर्ट करण्यात आलं नसल्याची तक्रार नागरिकांची आहे. त्यामुळे रहिवाशी भागात पाणी शिरल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. या पूरपरिस्थितीमुळे चारचाकी वाहनेही पाण्यात तरंगू लागली होती. या पूरस्थितीचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुण्यातील अनेक भागात पाणी आणि वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे. तसेच नागरिकांना घरात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

पुण्यातील मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपाययोजनांसाठी बैठकांचा सपाटा लावला. तसेच जिल्हा प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. पुणे शहरासहित पिंपरी-चिंचवड, मावळ आणि लोणावळा या भागातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

पुण्यासहित मुंबईतही पावसाने जोरदार बॅटिंग केली. मुंबईत आज गुरुवारी रात्री मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पावसामुळे पुण्याहून सुटणाऱ्या तीन एक्सप्रेस ट्रेन रद्द करण्यात आल्या आहे. तसेच ठाणे महापालिकेने शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. हवामान विभागाने पालघर, ठाणे आणि मुंबईला रेड अलर्ट जारी केला आहे.

महाराष्ट्रासहित गुजरात आणि मध्य प्रदेशला पावसाने झोडपलं; अनेक शहरे पाण्याखाली, शाळांना सुट्टी जाहीर
Gujarat Rain: गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार; देवदर्शनासाठी गेलेल्या नंदुरबारच्या ९० भाविकांसाठी NDRFचं पथक ठरले देवदूत

गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये पावसाचा हाहा:कार

महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या गुजरातला पावसाने झोडपून काढलं आहे. कच्छ आणि सौराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. या मुसळधार पावसामुळे ७ जिल्ह्यातील ४ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं आहे. गुजरातमधील पूर आणि पावसामुळे आतापर्यंत ६३ जणांना जीव गमवावा लागला आहे.

मध्य प्रदेशमध्येही काही शहरात पावसाने धुमाकूळ घातला आहे. कटनी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे ढीमरखेडा आणि बहोरीबंद तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली. या तालुक्यातील गाव पाण्याखाली गेले. या गावातील लोकांना एसडीआरएफच्या टीमकडून रेस्क्यू केलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com