Jitendra Awhad On Mumbai Local Train Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local Train: "एसी लोकलपेक्षा साध्या लोकलच्या फेऱ्या वाढवा, अन्यथा..." जितेंद्र आव्हाडांचा इशारा

Jitendra Awhad On Mumbai Local Train: २०० रुपयाला १ दिवसाचे तिकिट आहे साध्या लोकलचा महिन्याभराचा पास २१५ रुपयाला आहे कुणाला परवडेल? - जितेंद्र आव्हाड

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

मुंबई: मुंबईची लाईफलाईन असलेली मुंबईची लोकल (Mumbai Local) सध्या पुन्हा चर्चेत आली आहे. मुंबईल लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे, त्या तुलनेत लोकलच्या फेऱ्या कमी होत असल्याने लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी वेळोवेळी होत आली आहे. याबाबत आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad) यांनीही आपली भूमिका मांडत रेल्वेला जाहीर इशारा दिला आहे. एसी लोकलच्या फेऱ्यांपेक्षा साध्या लोकलच्या फेऱ्या वाढवा अशी मागणी जितेंद्र आव्हाडांनी केली आहे. तसेच मागण्या मान्य न केल्यास रेलरोको आंदोलन करावं लागेल असंही आव्हाड म्हणाले आहेत. (Jitendra Avhad Latest News)

हे देखील पाहा -

तीन दिवसांपूर्वीच कळवा रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांनी लोकल रोखत आंदोलन केले होते. कारशेडमधून निघणाऱ्या लोकलला एसी लोकलमध्ये बदलल्याने प्रवाशांनी हे आंदोनल केलं होतं. एसी लोकल ही साध्या लोकलपेक्षा खूपच महागडी असल्याने एसी लोकलचे तिकीटही महाग आहे. यामुळे सर्वसामान्यांना एसी लोकलने प्रवास करणं परवडत नाही. अशात एसी लोकलच्या फेऱ्या वाढवल्याने साध्या लोकलच्या फेऱ्या कमी झाल्या आहेत. यामुळे साध्या लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांसह आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

जितेंद्र आव्हाड हे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, सर्वसामान्य माणसांचा विचार न करणाऱ्या रेल्वेच्या नवीन धोरणांचा अभ्यास करा. साध्या लोकल कमी करून AC लोकल वाढविण्याचा अर्थ काय? AC लोकल सर्वसामान्य कष्टकऱ्यांना परवडेल का? त्यापेक्षा साध्या लोकल वाढवा. त्यांची Frequency वाढवा. हेच या समस्येवर उत्तर आहे. तसेच मुंब्रा व कळव्याच्या रेल्वे प्रवाशांना Frequency मुळे प्रचंड त्रासला सामोरे जावे लागत आहे. जेवढ्या ट्रेन येतात त्या सगळ्या भरून येतात ट्रेन मध्ये चढता देखील येतं नाही. मुंब्रा/कळव्याला 3 रा व 4 था प्लॅटफॉर्म बांधण्यात आला आहे. पण त्याचा फायदा कुणालाच होत नाही असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. त्याचप्रमाणे गाड्यांची Frequency कमी झाली आहे. यावरती लवकरात लवकर लक्ष देण्याची गरज आहे. अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. या सगळ्या समस्यांकडे लक्ष द्यावे अन्यथा आम्हांला आंदोलनाचा मार्ग मोकळा असेल असा इशाराही आव्हाडांनी दिला आहे.

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, मुंबईत गुरुवारी सकाळी आणि आज, सोमवारी सकाळी कळवा रेल्वे स्थानकावर लोक मोठ्या प्रमाणात बाहेर पडली. रेल्वेची फ्रिक्वेन्सी कमी आहे. कळवा ते सीएसएमटी एसी लोकलचा पास २ हजार रुपये आहे. AC लोकलची संख्या वाढवली जात आहे, जी न परवडणारी आहे. तुम्हाला प्लॅटफॉर्म वापरायचे नव्हते तर घातले कशाला. हा उद्रेक कुठल्याही क्षणी बाहेर पडेल. २०० रुपयाला १ दिवसाचे तिकिट आहे साध्या लोकलचा महिनाभराचा पास २१५ रुपयाला आहे कुणाला परवडेल? तसेच मागच्या तीन महिन्यात १८०मृत्यूमुखी पडलेत हे योग्य नाही, यावर उपाय करा, लोकलच्या फेऱ्या वाढवा असंही आव्हाड म्हणाले आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT