Central Railway Saam tv
मुंबई/पुणे

Central Railway : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; लोकल उशिराने, प्रवाशांचा खोळंबा

Central Railway update : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे लोकल उशिराने धावत आहेत. रेल्वे विस्कळीत झाल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

मध्य रेल्वेवरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. मध्य रेल्वेवरील अंबिवली ते टिटवाळादरम्यान वाहतूक विस्कळीत झाल्याची घटना घडली आहे. गवताला आग लागल्याने सिग्नल यंत्रणा विस्कळी झाली आहे. यामुळे ऐन घरी जाण्याच्या वेळी प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला आहे.

मध्य रेल्वेवरील आंबिवली ते टिटवाळादरम्यान रेल्वे रुळाशेजारील गवताला आग लागली. आगीत सिग्नल यंत्रणेचे केबल जळून खाक झाला. यामुळे मध्य रेल्वेच्या मार्गावरील लोकल उशिराने धावत आहेत. यामुळे शुक्रवारी सायंकाळी घराकडे परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

नेमकं काय घडलं?

मध्य रेल्वेच्या मार्गावरील आंबिवली ते टिटवाळा दरम्यान रेल्वे रुळाशेजारील गवताला अचानक आग लागल्याची घटना आज शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली. काही क्षणातच ही आग आजूबाजूला पसरली, यामध्ये रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेच्या केबल जळाल्याने सिग्नल यंत्रणा बंद झाली. तीन सिग्नल बंद झाल्याने कल्याण ते कर्जत दरम्यानची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

मॅन्युअली सिग्नल देत रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. दोन अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर या केबलचे दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर सिग्नल सुरू झाले असले, तरी कल्याण ते कसारा दरम्यानची रेल्वेसेवा ही आठ ते दहा मिनिटे उशिराने धावत होती. त्यामुळे घराकडे परतणाऱ्या चाकरमान्यांचे मात्र चांगलेच हाल झाल्याचे पाहायला मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पीडित महिलांना घेऊन पोलीस थेट भोंदू बाबा खरातच्या ऑफिसमध्ये, खळबळजनक महिती समोर|VIDEO

Maharashtra Live News Update: कांदा आणि मका उत्पादकांच्या विविध मागण्यांच्या प्रश्नी प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक

Kolhapur: जोतिबा मंदिरात पुजारी-भाविकांमध्ये कोणत्या कारणावरून हाणामारी झाली? नेमकी चूक कोणाची?

Viral Video: प्रेझेंटेशन देताना आला बॉयफ्रेंडचा मेसेज, स्क्रिनवर टेक्स पाहून क्लासमध्ये पसरला हशा, Video

Cold Storage : माजी आमदाराच्या मालकीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये भयंकर दुर्घटना; ९ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT