Mumbai Local Train News Western Railway traffic disrupted delay Virar to Churchgate local trains  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local Train News: तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत; स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी

Mumbai Local Train News Updates: मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. तांत्रिक कारणामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Mumbai Local Train News Updates: मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. तांत्रिक कारणामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे विरारकडून चर्चेगेटच्या दिशेने धावणाऱ्या गाड्या तब्बल १५ ते २० मिनिटं उशीराने धावत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत झाल्याने भल्यापहाटे कामावर निघालेल्या चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहेत.

ऐन कार्यालयीन वेळीसेवा पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळित झाल्याने चाकरमान्यांचे हाल होत आहेत. स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून येत आहे. तांत्रिक कारणामुळे काही लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्याची माहिती देखील मिळत आहे. त्यामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

रेल्वे प्रशासनाकडून लोकल सेवा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, मुंबईसह उपनगरातील काही भागात सोमवारी सकाळपासूनच पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. कार्यालयात लवकर पोहचण्याच्या उद्देशाने प्रवासी घरातून लवकर बाहेर पडले. पण पाऊस आणि लोकल सेवा विस्कळीत झाल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT