Mumbai Local Train Mega Block Sunday (10th September 2023 Saam TV
मुंबई/पुणे

Mega Block On Sunday: मुंबईकरांनो रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वेच्या मार्गावर मेगाब्लॉक, वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा...

Mumbai Local Train Mega Block Sunday: मुंबईकरांनो रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वेच्या मार्गावर मेगाब्लॉक, वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा...

Satish Kengar

Mumbai Local Train Mega Block Sunday (2nd September 2023):

मुंबईत लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. रविवारी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्यावतीने विविध अभियांत्रिकी कामे आणि देखभालीसाठी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यासोबतच हार्बर लाइनवरही उद्या मेगाब्लॉक असणार आहे.

यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून काही विलंबाने धावणार आहेत. याचबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. रविवारी पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही मेगाब्लॉक नसणार.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर तर हार्बर मार्गावरील मानखुर्द ते नेरुळ अप आणि डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

रविवारी माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यत मेगाब्लॉक असणार आहे. यादरम्यान, या CST येथून सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार. तसेच ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

तर मानखुर्द-नेरुळ अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१५ ते सायंकाळी ४.१५ वाजेपर्यत मेगाब्लॉक असणार आहे. यादरम्यान CST येथून पनवेल/बेलापूरसाठी सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि बेलापूरहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahapur News : टॉयलेटमध्ये रक्त आढळलं, विद्यार्थिनींची विवस्त्र करून तपासणी केली; शहापूरच्या इंग्लिश मीडियम शाळेतील प्रकार

Maharashtra Live News Update : मालवण येथे बेपत्ता मच्छीमाराचा मृतदेह 18 तासानंतर सापडला

शहापूरमध्ये शाळकरी मुलींना विवस्त्र करून मारहाण; पालकांचा एकच संताप, नेमकं काय घडलं? VIDEO

Cooking Tips : जेवणात जास्त गरम मसाला गेल्यास काय करावे?

बेळगावात मराठी कुटुंबानं उचललं टोकाचं पाऊल; विष प्राशन करून तिघांनी आयुष्य संपवलं, एकीची प्रकृती गंभीर | Belgaum

SCROLL FOR NEXT