फय्याज शेख, साम टीव्ही
शहापूर: बाथरूममध्ये रक्त पडलेले आढळल्याने मासिक पाळीच्या संशयाने 10 ते 12 मुलींचे अंतरवस्त्र काढून तपास केल्याने मुलींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. 14 ते 15 वर्षीय विद्यार्थिनींना शाळेच्या व्यवस्थापनाने पूर्ण कपडे उतरवून त्याची तपासणी केली. ही माहिती समजताच पालकांनी शाळा गाठली आणि गोंधळ घातला.
शहापूर शहरातील नामांकित दामानीया इंग्लिश शाळेचा एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी गायकवाड यांनी इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना मासिक पाळी या नैसर्गिक प्रक्रियेबाबत योग्य शिक्षण देण्याऐवजी त्यांच्यावर मानसिक दबाव टाकत ५वी ते १०वी इयत्ता शिकणाऱ्या विद्यार्थिनींसोबत अत्यंत खालची पातळी गाठली आहे. या विद्यार्थ्यींना विवस्त्र करण्याचा लजास्पद व प्रकार उघडकीस आला आहे .
शाळेमध्ये पालक आणि शालेय प्रशासन यांच्यात खूपच वादविवाद सुरू झाला आहे. सर्व पालकांनी एकत्र येत जो पर्यंत R.S. दमानिया शाळेमध्ये गुन्हा दाखल होत नाही, तो पर्यंत येथून जाणार नसल्याची भूमिका घेतली आहे. हे सर्व पालक शहापूर पोलिस ठाण्यात गेले असून मुख्यधापिकेला त्वरित अटक करण्याची मागणी होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.