Heavy Rain : शहापूर तालुक्यात पावसाचा जोर कायम; अनेक पूल पाण्याखाली, रहदारीचे रस्ते बंद

Shahapur News : राज्यात रायगड, नाशिक, पुणे, बुलढाणा, शहापूर, नंदुरबार या ठिकाणी बुधवारी रात्रीपासून जोरदार पावसाचे आगमन झाले आहे. अनेक दिवसांपासून जोरदार पावसाची प्रतीक्षा होती हि प्रतीक्षा आता थांबली
Heavy Rain
Heavy RainSaam tv
Published On

फैय्याज शेख 
शहापूर
: राज्यातील अनेक भागात रात्री पासूनच जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान शहापूर तालुक्यात देखील पावसाने जोर कमी होताना दिसत नाही. सतत मुसळधार पाऊस बरसत असल्याने तालुक्यातील अनेक नद्या नाल्यांना पुर परिस्थिती निर्माण झाली असून रहदारीचे रस्ते बंद झाले आहे. 

राज्यात रायगड, नाशिक, पुणे, बुलढाणा, शहापूर, नंदुरबार या ठिकाणी बुधवारी रात्रीपासून जोरदार पावसाचे आगमन झाले आहे. अनेक दिवसांपासून जोरदार पावसाची प्रतीक्षा होती हि प्रतीक्षा आता थांबली असून राज्यातील सर्वच भागात मान्सून सक्रिय होऊ लागला आहे. नाशिक, शहापूर व रायगडमध्ये मुसळधार पाऊस होत असल्याने अनेक ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. नाशिकच्या काही भागात तर घरांमध्ये पाणी शिरले आहे. 

Heavy Rain
Nashik Heavy Rain : नाशिकमध्ये मुसळधार पाऊस; सातपूर परिसरातील अनेक घरांमध्ये शिरले पाणी, त्र्यंबकेश्वरमधील रस्तेही पाण्याखाली

आवरी नदीवरील पूल पाण्याखाली 

दरम्यान शहापूर तालुक्यात जोरदार पाऊस होत असून आज सकाळी चरिव गावातील तीन मंदिर कानवे नदीला असलेल्या पुरामुळे पाण्याखाली गेले आहेत. तसेच शहापूर तालुक्यातील तुते- बामणे रस्त्यावरील आवरी नदीचा पुल नदीला आलेल्या पुरामुळे पाण्याखाली गेल्याने रहदारीचे रस्ता बंद झाला आहे. रस्ता बंद झाल्याने मुलांना शाळा, महाविद्यालय जाण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. 

Heavy Rain
Nagpur Police : नागपूरात वाढतेय नशेखोरी; ८ कोटींचे अंमली पदार्थ जप्त, नागपूर पोलिसांची दीड वर्षातील कारवाई

प्रशासन अलर्ट 

पुलावरून पाणी जात असल्याने ग्रामस्थांना कामानिमित्ताने तालुक्याच्या ठिकाणी जाता येत नाही. या सर्व घटनेकडे शहापूर तहसीलदार परमेश्वर कासूळे जातीने लक्ष ठेवून आहेत. मंडळ अधिकारी व तलाठी यांना कार्यालयाच्या ठिकाणी राहाण्याचे आदेश दिले आहेत. तर आपत्ती व्यवस्थापन व जीवरक्षक टीमच्या सदस्यांना तयार राहाण्याचे सुचना देखील दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com