Mumbai Local Mega Block on Sunday Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local Train: मुंबईकरांसाठी मोठी अपडेट; रविवारी रेल्वेच्या 'या' मार्गावर मेगाब्लॉक, प्रवाशांचे होणार हाल!

Mumbai Local Mega Block News: रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत काही लोकलसेवा उशिराने धावणार असून काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Satish Daud

Mumbai Local Mega Block on Sunday

मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सिग्नल यंत्रणा, रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायरच्या देखभाल-दुरूस्तीसाठी हा ब्लॉक घेण्यात येईल. या कालावधीत काही लोकलसेवा उशिराने धावणार असून काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. (Mumbai Local Train Mega Block News in Marathi)

प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच प्रवासाचं नियोजन करावं असं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिवली – गोरेगावदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल.  (Latest Marathi News)

ब्लॉक कालावधीत बोरिवली-गोरेगावदरम्यानची अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येईल. तसेच काही लोकलसेवा रद्द राहतील. ब्लॉकदरम्यान अंधेरी आणि बोरिवली लोकल गोरेगावपर्यंत हार्बर मार्गावरून चालविण्यात येईल. (Breaking Marathi News)

मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही

मध्य रेल्वेवरील सीएसएमटी येथील पायाभूत कामांसाठी १९, २० आणि २१ एप्रिलच्या रात्री पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी दिवसा मध्य आणि हार्बर मार्गावर कोणताही ब्लॉक नसेल.

पॉवर ब्लॉकमुळे सीएसएमटी स्थानकातून रात्रीची शेवटची लोकल १२.१४ वाजता सुटेल. या काळात सीएसएमटी ते भायखळा आणि हार्बरवरील वडाळा या मार्गावरील अप आणि डाऊन दिशेकडील वाहतूक बंद असेल. तसेच लांबच्या पल्ल्याच्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्याही स्थगित असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: 40 वर्षापासून सुरू असलेल्या अवैध दारू धंद्यांवर पोलिसांनी का कारवाई केली नाही - अण्णा बनसोडे

लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट; 'या' महिलांवर कडक कारवाईचे संकेत

Heart Attack: सकाळी उठल्या उठल्या शरीरात 'हे' ६ बदल दिसल्यास दुर्लक्ष करू नका; असू शकतो हृदयविकाराचा झटका

Maharashtra Monsoon : महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट, मराठवाड्यावर सर्वात मोठं सकंट; हवामान विभागाच्या अंदाजाने धाकधूक वाढली

Monsoon Picnic Tourism: धुक्याने वेढलेले डोंगर, खळखळणारे धबधबे आणि हिरवाईचा साज पाहायचाय? मग ही TOP 10 ठिकाणं नक्की यादीत ठेवा

SCROLL FOR NEXT