Mumbai Local Train Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Train: रेल्वेचा मास्टरप्लान! आता दर ३ मिनिटांनी धावणार मुंबई लोकल

Railway Plan For Mumbai Local Frequency: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता मुंबई लोकलची सेवा अजून वाढवण्याच्या तयारीत आहे. दर तीन मिनिटांनी मुंबई लोकल धावणार आहे.

Siddhi Hande

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी

आता दर तीन मिनिटांनी धावणार लोकल

रेल्वे मोठी योजना आखण्याच्या तयारीत

लोकल ही मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. लोकलला मुंबईकरांची लाईफलाइन असेही म्हटले जाते. जगातील सर्वात मोठ्या रेल्वेपैकी एक मुंबई लोकल आहे. दरम्यान, आता मुंबई लोकलबाबत रेल्वे प्रशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. आता दोन रेल्वेंमधील वेळ हा अजून कमी करण्याचा प्रयत्न आहे.

मुंबई लोकलबाबत एक अशी योजना तयार करण्यात येणार आहे की, ज्यामध्ये दर ३ मिनिटांनी रेल्वे धावणार आहे. दर तीन मिनिटांनी रेल्वे असणार आहे. यामुळे ट्रेनमध्ये होणाऱ्या गर्दीपासून सुटका होणार आहे. लोकलची संख्या वाढली तर त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे.

सध्या १८१० लोकल ट्रेन धावतात. या ट्रेन वाढवू ५००० करण्याची क्षमता करण्यात येणार आहे. यामुळे कळवा, मुंब्रा, बदलापूर या ठिकाणी दर तीन मिनिटाला ट्रेन असणार आहे. यामुळे स्टेशनवरील गर्दी कमी होणार आहे.

माजी मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक रजनीश गोयल यांनी हा प्रस्ताव सादर केला होता. या योजनेत उपनगरीय रेल्वेचं लहान ऑपरेटिंग झोनमध्ये विभाजन करण्याचा प्रस्ताव दिला होईल. त्यामुळे दोन रेल्वेंमधील वेळ कमी होईल. गर्दी कमी होईल. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रस्तावाला मान्यतादेखील दिली होती. मात्र, काही कारणांनी अद्याप ही योजना रखडली आहे.

जर रेल्वेची संख्या वाढली आणि दर तीन मिनिटांनी लोकलसेवा सुरु झाली तर प्रवाशांना खूप फायदा होणार आहे. सध्या गर्दीमुळे अनेक अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळेच जर दर तीन मिनिटांनी लोकल सुरु झाली तर खूप फायदा होणार आहे. यामुळे रेल्वेची संख्या तीनपट वाढू शकते. ही संख्या १८१० वरुन ५०० होऊ शकते.

काय फायदा होणार?

दर तीन मिनिटांनी लोकल सुरु झाल्यामुळे गर्दी कमी होईल. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाईल.

प्रत्येक ट्रेनचे चक्र ३० ते ४५ मिनिटांत पूर्ण होईल. यामुळे टाईमटेबल सुधारेल.

मध्यवर्ती स्थानक म्हणजे विक्रोळी, भांडूप, कांजूर या ठिकाणावरील प्रवाशांना कमी गर्दीच्या लोकलमध्ये चढायला मिळेल. यामुळे प्लॅटफॉर्मवरी गोंधळ कमी होईल.

यामुळे प्रवास जलद पूर्ण होईल. जास्तीत जास्त रेल्वे फेरी शक्य आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Woolen Clothes: थंडीत लोकरीच्या कपड्यांना दुर्गंधी येतेय? फॉलो करा 'या' घरगुती टिप्स

आईच्या साडीनं मुलानं आयुष्याचा दोर कापला; सातवीतल्या विद्यार्थ्यानं उचललं टोकाचं पाऊल

Health Tips : सकाळी नाश्ता करणे गरजेचे आहे की नाही? संशोधनातून समोर आली नवीन माहिती

Rohit Sharma-Virat Kohli : 'रो-को'ला ब्रेक! रोहित शर्मा, विराट कोहलीचं कमबॅक लांबणीवर, मोठी अपडेट आली

Shivani Surve: मराठमोळी अभिनेत्री शिवानी सुर्वेचं वय किती?

SCROLL FOR NEXT