Special Trains: कन्फर्म तिकीट! दिवाळीसाठी १२००० विशेष ट्रेन; प्रत्येक मार्गावर फटाफट मिळतील रेल्वे

Indian Railways : दिवाळी आणि छठ पूजेच्या सणासाठी भारतीय रेल्वेने तयारी सुरू केलीय. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, प्रवाशांच्या सोयीसाठी गेल्या वर्षीपेक्षा १२,००० विशेष गाड्या चालवण्याची तयारी करण्यात आली होती.
Indian Railways
Indian Railways to run 1200 special trains for Diwali and Chhath Puja travel rush.Saam Tv
Published On
Summary
  • दिवाळी आणि छठपूजेसाठी रेल्वेने १२००० विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत.

  • प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली.

देशात दिवाळीची तयारी जोरात सुरू आहे. अनेकजण छठपूजे आणि दिवाळीसाठी घरी जाण्यासाठी ट्रेन आणि बसेस बुक करत आहेत. या प्रवाशांना घरी सुरक्षित पोहचण्यासाठी भारतीय रेल्वेही सज्ज झाले आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी जास्त विशेष गाड्या चालवल्या जाणार असल्याचं केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही यासंबंधी माहिती दिली.

Indian Railways
EPFO Rule: मोठी बातमी! पैसे काढण्याच्या नियमात होणार बदल; सरकारच्या नव्या नियमामुळे ७ कोटी पीएफधारकांना होणार फायदा

गेल्या वर्षीपेक्षा ४,५०० जास्त गाड्या

छठ आणि दिवाळीसाठी रेल्वेच्या कामकाजाचा संदर्भ देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, गेल्या वर्षी या सणांसाठी ७,५०० विशेष गाड्या चालवण्यात आल्या होत्या. यावेळी आम्ही आमची क्षमता आणखी वाढवत असल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिलीय. दिवाळी आणि छठपुजेच्या सणावेळी दिल्ली, मुंबई सारख्या शहारातून मोठ्या संख्येने प्रवाशी आपल्या गावी जात असतात. त्याच्या सेवेसाठी यावर्षी पुरेशा प्रमाणात रेल्वे गाड्या सुरू करण्यात येणार आहेत.

Indian Railways
Indian Railway: तत्काळ अन् काउंटर तिकीट बुकिंगबाबत रेल्वेचे नवे नियम

२० टक्के सूट

रेल्वे मंत्र्यांनी नवीन प्रयोगात्मक योजनाची माहिती दिली. त्याअंतर्गत १३ ऑक्टोबर ते २६ ऑक्टोबरदरम्यान प्रवास करणाऱ्यांना कन्फर्म तिकीट मिळेल. तर १७ नोव्हेंबर ते १ डिसेंबर दरम्यान प्रवास करणाऱ्यांना प्रवासांना २० टक्के सवलत मिळेल जाईल. दरम्यान रेल्वे विभागाकडून आतापर्यंत १० हजार विशेष रेल्वेंची अधिसूचना जारी करण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com