Railway Mega Block : प्रवाशांनो लक्ष द्या! 'या' मार्गावर असणार उद्या मेगा ब्लॉक, जाणून घ्या रेल्वेचे वेळापत्रक

Mumbai Railway Local : २१ सप्टेंबर रोजी मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक होणार असून ठाणे-कल्याण दरम्यान जलद मार्गावरील गाड्या धीम्या गतीने सुरु राहणार आहेत. पनवेल-वाशी हार्बर गाड्या व ठाणे-पनवेल ट्रान्स-हार्बर गाड्या रद्द. प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा.
Railway Mega Block : प्रवाशांनो लक्ष द्या! 'या' मार्गावर असणार उद्या मेगा ब्लॉक, जाणून घ्या रेल्वेचे वेळापत्रक
Mumbai Local NewsSaam Tv
Published On
Summary
  • २१ सप्टेंबर रोजी मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक होणार

  • ठाणे-कल्याण दरम्यान जलद मार्ग बंद, गाड्या धिम्या मार्गावर

  • पनवेल-वाशी हार्बर व ठाणे-पनवेल ट्रान्स-हार्बर गाड्या रद्द

  • प्रवाशांसाठी विशेष गाड्यांची व्यवस्था, १० मिनिटांचा उशीर होणार

मुंबईतील लोकल रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातर्फे रविवार, दि. २१ सप्टेंबर २०२५ रोजी मोठा देखभाल मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी, अभियांत्रिकी दुरुस्ती कामांसाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने हा ब्लॉक आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या ब्लॉकदरम्यान मुख्य मार्गिका, हार्बर मार्ग आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवांमध्ये मोठे बदल होणार असून अनेक गाड्या रद्द किंवा वळविण्यात येणार आहेत.

मुख्य मार्गिकेवर ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान सकाळी १०.४० ते दुपारी ३.४० या कालावधीत अप आणि डाऊन जलद मार्ग बंद राहणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सकाळी ९.३४ ते दुपारी ३.०३ दरम्यान सुटणाऱ्या सर्व डाऊन जलद व अर्ध-जलद लोकल गाड्या ठाणे ते कल्याणदरम्यान धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या त्यांच्या नेहमीच्या थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवरही थांबतील. यामुळे या गाड्या गंतव्य स्थानकावर साधारणपणे दहा मिनिटे उशिराने पोहोचणार आहेत.

Railway Mega Block : प्रवाशांनो लक्ष द्या! 'या' मार्गावर असणार उद्या मेगा ब्लॉक, जाणून घ्या रेल्वेचे वेळापत्रक
Kalyan Traffic : कल्याण पोलिसांचा वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोठा निर्णय; नवरात्रौत्सव काळात जड वाहनांना बंदी

याचप्रमाणे कल्याणहून सकाळी १०.२८ ते दुपारी ३.४० दरम्यान सुटणाऱ्या अप जलद व अर्ध-जलद लोकल गाड्याही कल्याण ते ठाणे या दरम्यान धिम्या मार्गावर धावतील. या गाड्यांनाही दिवा, मुंब्रा आणि कळवा येथे थांबावे लागणार आहे. मुलुंडपासून या गाड्या पुन्हा जलद मार्गावर धावतील. परिणामी या गाड्यांनाही सुमारे दहा मिनिटांचा उशीर होणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - दादर येथून सुटणाऱ्या डाऊन मेल - एक्सप्रेस गाड्या ठाणे ते कल्याणदरम्यान पाचव्या मार्गावर, तर दादरकडे येणाऱ्या अप मेल - एक्सप्रेस गाड्या कल्याण ते ठाणे - विक्रोळी दरम्यान सहाव्या मार्गावर वळविण्यात येतील.

Railway Mega Block : प्रवाशांनो लक्ष द्या! 'या' मार्गावर असणार उद्या मेगा ब्लॉक, जाणून घ्या रेल्वेचे वेळापत्रक
EPFO Passbook Lite : तुमच्या पीएफ खात्यात किती रक्कम आहे? ‘पासबुक लाइट’द्वारे मिनिटांत समजणार, जाणून घ्या प्रक्रिया

हार्बर मार्गावरील प्रवाशांनाही या दिवशी गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान अप व डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत ब्लॉक राहणार आहे. या दरम्यान पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून पनवेलकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द केल्या जाणार आहेत.

याशिवाय ट्रान्स-हार्बर मार्गावरील ठाणे-पनवेल विभागातही मोठा बदल होणार आहे. पनवेलहून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ पर्यंत सुटणाऱ्या ठाण्याकडे जाणाऱ्या गाड्या तसेच ठाण्याहून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० दरम्यान सुटणाऱ्या पनवेलकडे जाणाऱ्या गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत.

Railway Mega Block : प्रवाशांनो लक्ष द्या! 'या' मार्गावर असणार उद्या मेगा ब्लॉक, जाणून घ्या रेल्वेचे वेळापत्रक
Maharashtra Investment : राज्यात ८०,९६२ कोटींची गुंतवणूक; ४०,३०० रोजगार निर्मिती होणार, कोणत्या जिल्ह्यांना थेट फायदा?

प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने पर्यायी व्यवस्था केली आहे. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी दरम्यान विशेष लोकल गाड्या चालवल्या जातील. तसेच ठाणे ते वाशी- नेरुळ दरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा सुरू राहील. पोर्ट मार्गावरील सेवा देखील नेहमीप्रमाणेच उपलब्ध असेल. या ब्लॉकदरम्यान नेहमीप्रमाणेच प्रवाशांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने अनेकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागेल. रविवारी नेहमीपेक्षा अधिक संयम आणि वेळ ठेवून प्रवास करणे गरजेचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com