Mumbai Local Central Line Issue: Central Railway Services Between Kalyan to Kurla Stations Disrupted After Signal Failure In Thane Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local Train News: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; आठवड्याच्या पहिल्या दिवशी प्रवाशांना मनस्ताप

Mumbai Local Train News Today For Central Line: मध्य रेल्वेची वाहतूक सोमवारी सुकाळी पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सकाळी कामासाठी निघालेल्या प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Vishal Gangurde

मुंबई : मध्य रेल्वेची वाहतूक सोमवारी सुकाळी पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सकाळी कामासाठी निघालेल्या प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. कल्याण ते कुर्लादरम्यान वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे लोकल ट्रेन उशिराने धावत आहेत. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशी नोकरदारांना 'लेटमार्क' सामोरे जावे लागणार आहे.

मध्य रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा आठवड्याच्या पहिल्या दिवशी खोळंबा झाला. ठाणे रेल्वे स्टेशनजवळ सिग्नस यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेवरील स्टेशनवर शेकडो प्रवाशांचा रेल्वे स्टेशनवर एकच गर्दी झाली आहे. ठाणे रेल्वे स्टेशनजवळ काही वेळापूर्वी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने ही वाहतूक विस्कळीत झाली आहे.

यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वे आणि ट्रान्सहार्बर मार्गावरही त्याचा परिणाम झाला आहे. याचा फटका कुर्ला ते कल्याणदरम्यान प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. ही सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असं रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल धनराज निला यांनी सांगितलं की, 'ठाणे रेल्वे स्टेशनजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आहे. यामुळे मध्य रेल्वेवरील कुर्ला ते कल्याण आणि ट्रान्स हार्बरमार्गावर परिणाम झाला आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Singada Benefits : शिंगाडे संजीवनीपेक्षा कमी नाही; ५ फायदे वाचून व्हाल चकीत, आजच आहारात करा समावेश

Maharashtra Live News Update : दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

New Flyover: गुड न्यूज! मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, कुर्ला ते घाटकोपरपर्यंत तयार होणार उड्डाणपूल

Dhangar Reservation : आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन; सुसाईड नोट आढळल्याने खळबळ

Diwali 2025 Don't Do: लक्ष्मीपूजनच्या रात्री चुकूनही करू नका 'ही' कामं; देवी लक्ष्मी होऊ शकते नाराज

SCROLL FOR NEXT