Mumbai University 60-40 Pattern : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! मुंबई विद्यापीठात पुन्हा ६०-४० पॅटर्न

Mumbai University : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून बी.ए, बी.कॉम, बी. एस्सी. या अभ्यासक्रमांकरिता पुन्हा एकदा ६०-४० चा पॅटर्न लागू होणार आहे.
Saam TV
Mumbai University 60 40 PatternMumbai University
Published On

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलीये. महाविद्यालयातील बंद केलेला ६०-४० गुणांचा पॅटर्न पुन्हा एकदा सुरू होत आहे. मुंबई-विद्यापिठाने नवीन शैक्षणिक वर्षापासून हा पेपर पॅटर्न लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने जास्तीत जास्त गुण मिळवण्यास मदत होऊ शकते.

Saam TV
Student Internet Activities: मुलं अभ्यास सोडून मोबाईलवर काय पाहतात? प्रत्येक पालकाला माहित असावी, अशी महिती रिपोर्ट्समधून उघड

अंतर्गत मूल्यमापनाचा गैरप्रकार

याआधी साल २०११ -२०१२ मध्ये मुंबई विद्यापीठात पहिल्यांदाच अंतर्गत मूल्यमापन ६० -४० चा पॅटर्न लागू केला होता. मात्र अंतर्गत मूल्यमापनात काही ठिकाणी गैरप्रकार झाल्याचं उघड झालं होतं. त्यामुळे बी.कॉमच्या विद्यार्थ्यांचा निकाल थेट ८० ते ८५ टक्क्यांपर्यंत पोहचला होता. त्यामुळे पुढे २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून ६० -४० चा पॅटर्न पूर्णता बंद करण्यात आला.

त्यानंतर सेल्फ फायनान्स आणि एलएलबीच्या विद्यार्थ्यांनाच हा पॅटर्न लागू होता. त्याव्यतीरिक्त अन्य अभ्यासक्रमासाठी १०० मार्कांची परिक्षा घेतली जात होती. अशात आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून बी.ए, बी.कॉम, बी. एस्सी. या अभ्यासक्रमांकरिता पुन्हा एकदा ६०-४० चा पॅटर्न लागू होणार आहे.

मुंबई विद्यापीठाने याबाबत एक परिपत्रक जारी करत वार्षिक लेखी परीक्षा ६० गुणांची आणि अंतर्गत मूल्यमापन ४० गुणांचे असेल, अशी माहिती दिली आहे. काही स्वायतत्ता मिळवलेल्या महाविद्यालयांमध्ये हा पॅटर्न आधीपासूनच सुरू आहे. अंतर्गत मूल्यमापनाच जास्त गुण आल्याने आता विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थिती अधिक वाढण्याची शक्यता आहे.

Saam TV
Mumbai North Lok Sabha: कोण होणार उत्तर मुंबईचा खासदार? पियुष गोयल भाजपाचा गड राखणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com