Mumbai North Lok Sabha: कोण होणार उत्तर मुंबईचा खासदार? पियुष गोयल भाजपाचा गड राखणार?

Lok Sabha Election 2024: उत्तर मुंबई मतदारसंघावर भाजपने मागील दहा वर्षांपासून वरचष्मा ठेवला आहे. देशात सर्वाधिक मते घेऊन गोपाळ शेट्टी या मतदारसंघातून खासदार झाले. मात्र वयाचे कारण पुढे करत शेट्टी यांचा पत्ता कट करण्यात आला.
कोण होणार उत्तर मुंबईचा खासदार? पियुष गोयल भाजपाचा गड राखणार?
Piyush Goyal Vs Bhushan PatilSaam Tv
Published On

Piyush Goyal Vs Bhushan Patil:

उत्तर मुंबई मतदारसंघावर भाजपने मागील दहा वर्षांपासून वरचष्मा ठेवला आहे. देशात सर्वाधिक मते घेऊन गोपाळ शेट्टी या मतदारसंघातून खासदार झाले. मात्र वयाचे कारण पुढे करत शेट्टी यांचा पत्ता कट करण्यात आला. त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री पियुष गोयल रिंगणात आहेत. तर मविआकडून भूषण पाटील निवडणूक लढतायेत.

उत्तर मुंबई हा मुंबईतील सर्वाधिक चर्चेत असलेला मतदारसंघ आहे. स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पराभूत करणारा मतदारसंघ, अशी या मतदारसंघाची ओळख आहे. पुढे हा भाजपला बालेकिल्ला झाला. 1989 साली भाजपच्या तिकिटावर राम नाईक खासदार म्हणून निवडून आले. 2004 च्या निवडणुकीत अभिनेता गोविंदाने त्यांचा पराभव केला. मात्र पुढच्या निवडणुकीत काँग्रेसने गोविंदा ऐवजी संजय निरुपम यांना उमेदवारी दिली. त्याही निवडणुकीत राम नाईक यांचा पराभव झाला.

कोण होणार उत्तर मुंबईचा खासदार? पियुष गोयल भाजपाचा गड राखणार?
Arvind Kejriwal: चीनने कब्जा केलेली जमीन परत घेणार; केजरीवाल यांच्या १० गॅरंटी

मात्र पुढे 2014 पासून मोदी लाटेत गोपाळ शेट्टी या ठिकाणी दोन वेळा खासदार झाले. यंदा मात्र वयाच्या मुद्यावरुन शेट्टी यांचा पत्ता कट करुन केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना रिंगणात उतरवलं आहे. काँग्रेसने भूमिपूत्र भूषण पाटील यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडून स्थानिक विरुद्ध बाहेरचा उमेदवार असा प्रचार केला जातोय. गोयल यांनी मात्र हा मुद्दा खोढून काढला आहे.

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ अनेक वर्ष काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला. मात्र राम नाईक आणि गोपाळ शेट्टी यांच्या रूपाने भाजपने इथं आपली पाळेमुळे घट्ट रोवली. भाजपाच्या विजयात शिवसेनेचा देखील वाटा राहिलेला आहे. यंदा काँग्रेसला मात्र इथे उमेदवार शोधून सापडेना. तेव्हा शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार विनोद घोसाळकर यांनी लढण्याची तयारी सुरू केली होती. मात्र काँग्रेसने ही जागा आपल्याकडे खेचून घेतली आणि भूषण पाटील यांना उमेदवारी देऊन मराठी कार्ड खेळण्याचा प्रयत्न केलाय.

कोण होणार उत्तर मुंबईचा खासदार? पियुष गोयल भाजपाचा गड राखणार?
Maharashtra Politics 2024 : नरेंद्र मोंदींनी शरद पवार, उद्धव ठाकरेंना का दिली ऑफर? ; प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं यामागचं खरं कारण

2019 मधील मतांची आकडेवारी

  • गोपाळ शेट्टी (भाजप) - 7 लाख 66 हजार 78

  • उर्मिला मातोंडकर (काँग्रेस) - 2 लाख 41 हजार 431

  • सुनील उत्तम थोरात (वंचित) - 15 हजार 691

  • नोटा - 11 हजार 966

  • मनोज कुमार जयप्रकाश सिंग (बसपा) - 3 हजार 925

2014 मधील मतांची आकडेवारी

गोपाळ शेट्टी (भाजप) - 6 लाख 64 हजार चार

संजय निरुपम (काँग्रेस) - 2 लाख 17 हजार 422

सतीश पारसमल जैन (आम आदमी पक्ष) - 32 हजार 364

यादव कमलेश सोमनाथ (समाजवादी पक्ष) - 5 हजार 506

अशोक चंद्रपाल सिंग (बसपा) - 5 हजार 438

पियुष गोयल हे प्रथमच लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत. गोयल यांना मासळीचा वास सहन होत नाही ते आयात केलेल उमेदवार आहेत. त्यांना स्थानिक प्रश्नांची जाण नाही, असा प्रचार विरोधकांकडून केला जात आहे. मात्र बोरिवली, कांदिवली भागातील आरएसएसची ताकद आणि गोपाळ शेट्टी यांची मतदारसंघातील घट्ट बांधणी यामुळे गोयल यांना लढाई सोपी मानली जातेय. तर दुसरीकडे काँग्रेस उमेदवार भूषण पाटील जनसंपर्क असलेले स्थानिक उमेदवार आहेत. स्थानिक प्रश्नांची त्यांना जाण आहे. त्यामुळे काँग्रेस शेवटच्या क्षणी बाजी मारु शकते, असा दावा केला जातोय. मतदारराजाचा निर्णय काय असणार हे 4 जूनला कळेलच...

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com