Maharashtra Politics 2024 : नरेंद्र मोंदींनी शरद पवार, उद्धव ठाकरेंना का दिली ऑफर? ; प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं यामागचं खरं कारण

Lok Sabha Election 2024 : नंदुरबारमधील सभेत नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना एनडीएसोबत येण्याची ऑफर दिली होती. त्यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजप २७२ चाही आकडा गाठणार नसल्याचं म्हटलं आहे.
Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024Saam Digital

लोकसभा निवडणुकीत भाजपने ४०० पार चा नारा दिला असून त्या पार्श्वभूमीवर प्रचारही सुरू आहे. दरम्यान नंदुरबारमधील सभेत नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना एनडीएसोबत येण्याची ऑफर दिली होती. त्यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजप २७२ चाही आकडा गाठणार नाही, त्यामुळेच त्यांनी पवार आणि ठाकरेंना ऑफर दिली आहे, असा टोला लगावला आहे.

नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना आमच्या सोबत या अशी दिलेली ऑफर म्हणजे ते 272 पर्यंत पोहचत नाहीत याची कबुली असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी आज पालघर मध्ये केला . पालघर लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार विजया म्हात्रे यांच्या प्रचार सभेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते .

एनडीए देशात 272 हा आकडा पार करू शकत नाही आणि ते त्यांच्या भाषणांमधून दिसून येत येत आहे . शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी येत्या काळात आमच्या सोबत यावं अन्यथा त्यांची काही खैर नाही, असाच इशारा एक प्रकारे मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना दिला असल्याची टीका देखील प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर सभेतून केली.

Maharashtra Politics 2024
Pune Loksabha: मतदानाआधी पुण्यात मोठी घडामोड! रवींद्र धंगेकरांचे निवडणूक आयोगाला पत्र; भाजपवर गंभीर आरोप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com