Raj-Uddhav Thackeray Garjana Morcha: ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधुंची 'गर्जना', आज मुंबईत मोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा

Election Commission Chief Gyanesh Kumar: देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मोर्चा निघणार आहे. या मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Raj-Uddhav Thackeray Garjana Morcha: ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधुंची 'गर्जना', आज मुंबईत मोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा
Raj-Uddhav Thackeray MorchaSaam Tv
Published On: 
  • ठाकरे बंधू निवडणूक आयोविरोधात आक्रमक

  • ज्ञानेश कुमारांविरोधात मुंबईत गर्जना मोर्चा

  • मेट्रो सिनेमा ते महापालिका असा असेल मोर्चाचा मार्ग

  • काँग्रेस- राष्ट्रवादी शरद पवार गटाचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला पाठिंबा

केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ठाकरे बंधू आक्रमक झाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात रस्त्यावर उतरणार आहेत. आज मुंबईत ठाकरे बंधुंचा गर्जना मोर्चा निघणार आहे. या मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गर्जना लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी असं या मोर्चाला नाव देण्यात आले आहे. मेट्रो सिनेमा ते महापालिका असा मोर्चा धडकणार आहे. सकाळी १० वाजता या मोर्चाला सुरूवात होणार आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी या मोर्चामध्ये राज्यातील सर्व विरोधी पक्षांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या मोर्चासाठी ठाकरे बंधूंना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. या मोर्चात मनसे आणि शिवसेना ठाकरेसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते आणि नागरीक मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे. मेट्रो सिनेमा इथून निघणारा हा मोर्चा मुंबई महानगर पालिका मुख्यालयापर्यंत जाणारर आहे. त्याठिकाणी सांगता सभा देखील होणार आहे. या सभेमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे काय गर्जना करणार याकडे राज्यासह देशाचं लक्ष लागले आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या गर्जना मोर्चाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. या मोर्चानिमित्त ठाकरे बंधू पुन्हा एकत्रित आले आहेत. त्यांच्या या एकत्रित मोर्चाचे दादरसह मुंबईतील ठिकठिकाणी बॅनर्स लावण्यात आले आहेत. या बॅनर्सची चर्चा होत आहे. गर्जना लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी असा उल्लेख या बॅनरवरती करण्यात आलेला आहे. या मोर्चापूर्वी ठाकरे बंधूंच्या मोर्चासंदर्भातील टीझर रिलीज करण्यात आला होता. या टीझरची देखील चांगलीच चर्चा झाली.

महत्वाचे म्हणजे या मोर्चासाठी टी- शर्ट तयार करण्यात आले आहेत. ठाकरेंच्या मोर्चासाठी पदाधिकाऱ्यांची जोरदार तयारी केली. 'ठाकरेंचा मोर्चा देशभर चर्चा', असे लिहिलेले टी-शर्ट घालून शिवसेना आणि मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोर्चात सहभागी होणार आहेत. टीशर्टवरच्या व्यंगचित्रात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचेही चित्र आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com