Central Railway to conduct night traffic and power block for launching 18 steel girders on the Badlapur Road Over Bridge. Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! 12 दिवसांचा मेगा ब्लॉक, वाचा संपूर्ण वेळापत्रक

Major Night Block On Central Railway For Badlapur ROB: बदलापूर रोड ओव्हर ब्रिजसाठी १८ नॉन-स्टँडर्ड स्टील गर्डर्स लाँचिंगचे काम करण्यासाठी २२ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर २०२५ दरम्यान मध्य रेल्वेने विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे.

Omkar Sonawane

बदलापूर रोड ओवर ब्रिज (ROB) साठी १८ नॉन-स्टँडर्ड स्टील गर्डर्स लाँचिंगचे काम करण्यासाठी २२/२३.११.२०२५ ते ०३/०४.१२.२०२५ या कालावधीत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परिचालीत करण्यात येणार आहे

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात बदलापूर रोड ओवर ब्रिज (ROB) साठी ३७.२ मीटर लांबीचे १८ नॉन-स्टँडर्ड स्टील गर्डर्स लाँचिंगचे काम करण्यासाठी, अप व डाउन मुख्य मार्गावर ३५० एमटी क्षमतेच्या रोड क्रेनचा वापर करून, २२/२३.११.२०२५ ते ०३/०४.१२.२०२५ या कालावधीत विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येईल.

ब्लॉकची तारीख : २२/२३.११.२०२५ (शनिवार/रविवार रात्री) ते ०३/०४.१२.२०२५ (बुधवार/गुरुवार रात्री)

ब्लॉकचा कालावधी : ०२.०० ते ०३.३० (१ तास ३० मिनिटे)

ट्रॅफिक ब्लॉक विभाग :

अप मार्गिका – वांगणी (क्रॉसओव्हर्ससह) ते अंबरनाथ (क्रॉसओव्हर्स वगळून)

डाउन मार्गिका – अंबरनाथ (क्रॉसओव्हर्स वगळून) ते वांगणी (क्रॉसओव्हर्ससह)

ब्लॉकमुळे होणारे परिणाम पुढीलप्रमाणे :

अप मेल/एक्सप्रेस गाड्यांचे वळवणे

खालील गाड्या कर्जत –पनवेल–दिवा मार्गे वळविण्यात येतील आणि कल्याणला प्रवासी सुविधा म्हणून पनवेल व ठाणे येथे थांबा दिला जाईल:

गाडी क्रमांक 11020 भुवनेश्वर–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस

गाडी क्रमांक 18519 विशाखापट्टणम–लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

अप मेल/एक्सप्रेस गाड्यांचे नियमन

गाडी क्रमांक 12702 हैदराबाद–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हुसैनसागर एक्सप्रेस

नेरळ स्टेशनवर ०३.१० ते ०३.३० वाजेपर्यंत नियमन करण्यात येईल.

गाडी क्रमांक 11140 होस्पेट–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस

भिवपुरी रोड स्टेशनवर ०३.१७ ते ०३.२७ वाजेपर्यंत नियमन करण्यात येईल.

ब्लॉक कालावधीत उपनगरी गाड्यांची शॉर्ट टर्मिनेशन / शॉर्ट ओरिजिनेशन

S1 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.१२ वाजता सुटणारी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कर्जत लोकल, अंबरनाथ येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल.

S2 कर्जत–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकल, करजात येहून ०२.३० वाजता सुटणारी, अंबरनाथ येथून शॉर्ट ओरिजिनेट होईल आणि ०३.१० वाजता प्रस्थान करेल.

ही कामे पायाभूत सुविधा सुस्थितीत ठेवण्यासाठी व सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

११ वर्षीय शाळकरी मुलावर बिबट्याचा भीषण हल्ला, दप्तरामुळे वाचला जीव, नेमके काय घडले?

'मी मराठी आहे, बिहारींचं ऐकणार नाही', बॉसला अद्दल घडवण्यासाठी महिलेनं घेतली मनसे कार्यकर्त्यांची मदत, VIDEO व्हायरल

Jui Gadkari : डोक्यावर टोपी अन् पायात बूट; जुई गडकरीचा हटके लूक, पाहा Photos

Orry Funny Video: 'आज मी या महिलेला रस्त्यावर पैसे मागताना...'; उर्वशी रौतेलासोबत मजा करताना दिसला ओरी, VIDEO व्हायरल

Nashik Ring Road : नाशिकमधील वाहतूककोंडीची कटकट संपणार, ६६ किमीचा रिंग रोड, ८,००० कोटींचा प्रोजेक्ट कसा असेल?

SCROLL FOR NEXT