Mumbai Local Train Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Accident : लोकलच्या दारात लटकून प्रवास, खांबाला धडकला अन् जीव गमावला, कामावरून जाताना २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Mumbai local train accident : मुंबईतील वडाळा स्थानकाजवळ एका खांबाला डोके आदळल्याने एका 24 वर्षीय व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. वडाळा स्थानकाजवळील बुधवारी रात्री ही घटना घडली.

Namdeo Kumbhar

Accidental Death in Mumbai Local: मुंबईतील उपनगरी लोकल रेल्वेमधील वाढती गर्दी हा चिंतेचा विषय आहे. मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे अथवा पश्चिम रेल्वे, पिक अवरमध्ये गर्दीचा रेटा वाढतानाच दिसतो. त्यात कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी कधीकधी स्वतःला गर्दीत झोकून द्यावं लागतं. मग कधी चेंगराचेंगरी होते, कधी धक्काबुक्की, तर कधी मारामारी. कधी तर लोकलच्या दारात उभं राहून लटकत प्रवास करण्याची वेळही येते. अशाच एका घटनेत लोकलच्या दरवाजात लटकणाऱ्या प्रवाशाचा अपघाती मृत्यू झालाय. रेल्वे ट्रॅक शेजारील एका सिग्नलच्या खांबावर आदळल्यामुळे २४ वर्षीय तरूण लोकलमधून खाली पडला. त्याचा जागीच मृत्यू झाला.

मुंबईच्या वडाळा रेल्वे स्थानकाजवळ लोकल रेल्वेतून पडून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्री ही घटना घडली. मोहन घोलप (24 वर्ष) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो चेंबूर येथील रहिवासी असल्याचे समजलेय. कॉटन ग्रीन येथून कामावरून घरी जाताना आठ वाजून 40 मिनिटांनी लोकल वडाळा पूल ओलांडत असताना रुळांजवळील खांबाला धडकून खाली पडल्याने मोहन गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले, पण तोपर्यंत वेळ गेली होती. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

कॉटन ग्रीन येथील इंडिगो प्रेसमध्ये काम करणारा 24 वर्षे तरुण मोहन घोलप हा त्याचा मित्र निखिल बनसोडे याच्यासोबत कॉटन ग्रीन येथून चेंबूरला जात होता. रात्री 8.40 च्या सुमारास लोकल ट्रेनने वडाळा स्थानकातून जात असताना लोकलने वडाळा स्थानकातून प्रस्थान केले. या प्रवासादरम्यान मोहन रेल्वेच्या दरवाजात उभा होता. गाडी वडाळा पूल ओलांडत असताना चुकून रेल्वे रुळांजवळील खांबाला धडकून तो पडला.

प्रवाशी व निखिल बनसोडे यांनी ही घटना तात्काळ लक्षात येताच आपत्कालीन साखळी ओढली. रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असता घोलप यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे आढळून आले. त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले, पण त्याचा जागीच मृत्यू झाला होता, असे डॉक्टरांनी सांगितले. रेल्वे पोलिसांकडून अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली.

रेल्वे पोलिसांनी (जीआरपी) दिलेल्या माहितीनुसार, गाडी वडाळा पुलावरून निघाली होती. त्याचवेळी लोकलच्या दारात उभं असलेल्या घोलप यांचे डोके रेल्वे ट्रॅकच्या खांबाला धडकले. त्याचा तोल गेला आणि तो रुळाच्या बाजूला पडला. त्यामध्ये त्याला गंभीर इजा झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. याची अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

मुंबई लोकलच्या दारात उभं राहून प्रवास न करण्याच्या सूचना रेल्वेकडून वारंवार दिल्या जातात. पण होणारा उशीर, घरी जाण्याची घाई, ऑफिसला पोहचण्याचे टेन्शन यामध्ये मुंबईकर सर्सास लोकलच्या दारात उभं राहून प्रवास करतात. लोकलमधून असा प्रवास करणं टाळावा. कुठेतरी पोहचण्यापेक्षा जीव महत्त्वाचा असतो, हे कायम स्मरणात असावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill: बाल बाल बचावला गिल; ब्रूकनं मारलेला चेंडू लागला थेट शुबमनच्या डोक्याला|Video Viral

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

SCROLL FOR NEXT