Mumbai Local Shocking Video Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local: मुंबईत भरदिवसा धावत्या लोकलमध्ये स्मोकिंग, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; संतापजनक VIDEO व्हायरल

Mumbai Local Shocking Video: मुंबईमध्ये धावत्या लोकलमध्ये दोन जण स्मोकिंग करत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी संतप्त झाले असून त्यांनी कारवाईची मागणी केली.

Priya More
  • मुंबई लोकलमधील संतापजनक व्हिडीओ समोर

  • दोघे जण धावत्या लोकलमध्ये चिलम ओढताना दिसले

  • धावत्या लोकलमधील नशेचा प्रकार

  • हा व्हिडीओ पश्चिम रेल्वे मार्गावरील असल्याची माहिती

मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळख असलेली मुंबई लोकल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळी मुंबई लोकल प्रवाशांच्या सोयी-सुविधांमुळे नाही तर प्रवाशांच्या वाईट कृत्यामुळे चर्चेत आली आहे. मुंबई लोकलमधील दोन प्रवाशांचा एक असा व्हिडीओ समोर आला आहे जो पाहून नेटकऱ्यांना राग अनावर झाला आहे. सोशल मीडियावर तुफान व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दोन प्रवासी धावत्या लोकलमध्ये बिनधास्तपणे चिलम ओढताना दिसत आहे. हा व्हिडीओ समोर येताच प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई लोकलमधील सुरक्षा, नियमांचे पालन आणि रेल्वे प्रशासनाच्या व्यवस्थेवर देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल होणारा हा व्हिडीओ पश्चिम रेल्वे मार्गावर धावण्याऱ्या लोकलमधील आहे. व्हिडीओमध्ये एक तरुण आणि आणखी एक व्यक्ती लोकलच्या मालडब्यामध्ये बसून नशा करत आहेत. दोघेही चिलम ओढताना दिसत आहेत. या दोन व्यक्तींसोबत बसलेल्या एका व्यक्तीने या दोघांचे कृत्य मोबाइलमध्ये कैद केले. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, एक तरुण चिलम पेटवतो आणि ओढण्यास सुरूवात करतो. त्यानंतर तो सोबत असलेल्या दुसरा व्यक्तीकडे चिलम देतो. तो देखील चिलम ओढतो. दोघेही आलटून पालटून चिलम ओढतात. हे दोघेजण लोकलमधील इतर प्रवशांचा विचार न करता बिनधास्तपणे चिलम ओढत आहेत. ही घटना समोर येताच नेटकरी संतप्त झाले आहेत. नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून नाराजी व्यक्त केली. काही नेटकऱ्यांनी रेल्वे प्रशासनाकडे दोघांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

दरम्यान, हा व्हिडीओ कधीचा आहे?, कोणत्या लोकलमधून दोघेही प्रवास करत होते?, ही घटना नेमकी कोणत्या स्थानकादरम्यान घडली? याबाबत अद्याप काही माहिती समोर आली नाही. पण व्हिडीओच्या आधारे रेल्वे पोलिस दोन्ही व्यक्तींचा शोध घेत असून त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेमध्ये धुम्रपान करण्यास बंदी आहे. असे करणाऱ्यावर कारवाई केली जाते. रेल्वेच्या अधिनियम, १९८९ च्या कलम १६७ च्या अंतर्गत रेल्वे किंवा रेल्वे स्टेशन परिसरात धुम्रपान करणे गुन्हा आहे. असे केल्यास दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील ग्रामीण भागात पावसाची जोरदार हजेरी

कालीका मंदिरात पूजाऱ्याची निर्घृण हत्या, रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह

रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यायल्याने शरीरात काय बदल होतात?

Tuesday Horoscope: संपूर्ण दिवस आनंदात जाणार, 5 राशींच्या व्यक्तींना कामातून होणार लाभ; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Schwan Noodles Recipe: 15 मिनिटांत घरच्या घरी बनवा झणझणीत शेझवान नूडल्स; वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT