पाऊस गायब, पण छत्रीसाठी तुफान गर्दी! भाजप नेत्याच्या उपक्रमाची जोरदार चर्चा; खासगी सुरक्षारक्षक तैनात

umbrella distribution program by BJP leader Bhimashankar Hasule in Dharashiv: धाराशिवच्या जळकोटमध्ये भाजप नेते भीमाशंकर हासुरे यांच्याकडून छत्री वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. छत्री घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली असून, लांबच लांब रांगा आणि शिस्तीसाठी खासगी सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले.

धाराशिवच्या जळकोटमध्ये भाजप नेते भीमाशंकर हासुरे यांच्याकडून छत्री वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला छत्री घेण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली आहे. महिला आणि पुरुषांच्या स्वतंत्र रांगा करून कूपन दाखवत छत्र्यांचं वाटप केलं जात आहे. शिस्तबद्ध पद्धतीने छत्री वाटप व्हावं यासाठी खाजगी सुरक्षारक्षक तैनात करून हा छत्री वाटपाचा कार्यक्रम पार पडतोय. पावसानं दडी मारलेली असताना सुरू असलेल्या छत्री वाटपाच्या कार्यक्रमाची जोरात चर्चा आहे. दरम्यान आज ना उद्या पाऊस पडेल त्यामुळे नागरिकांना याचा वापर होईल त्यामुळे हा उपक्रम घेतला असुन सर्वांना छञी दिली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com