Railway Special Emergency Block Saam Tv
मुंबई/पुणे

Railway Emergency Block : रेल्वेचा विशेष आपत्कालीन ब्लॉक, मध्य-हार्बर रेल्वेच्या वाहतुकीत बदल; वाचा संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Local Special Emergency Block : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मस्जिद बंदर या स्थानकादरम्यान कर्नाक आरओबी गर्डर समायोजनाचे काम पूर्ण करण्यासाठी आज मध्यरात्री विशेष ब्लॉक असणार आहे.

Yash Shirke

Railway Emergency Block : मध्य-हार्बर रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. २७/२८ जानेवारी (आज मध्यरात्री) साडेबारा वाजल्यापासून ते चार वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मस्जिद बंदर या स्थानकादरम्यान विशेष आपत्कालीन ब्लॉक घेण्यात येण्यार आहे. कर्नाक आरओबी (टप्पा-२) च्या पुनर्बांधणीसाठी ओपन वेब गर्डर्सच्या समायोजनासाठी हा ब्लॉक ठेवण्यात आला आहे.

विशेष आपत्कालीन ब्लॉकमुळे रेल्वे वाहतुकीत पुढील बदल करण्यात आले आहेत.

१. ब्लॉक काळात मुख्य मार्गावरील भायखळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान आणि हार्बर मार्गावर वडाळा रोड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा उपलब्ध राहणार नाहीत.

२. मुख्य मार्गावरील अप आणि डाऊन उपनगरीय सेवा कल्याण, ठाणे, कुर्ला, परळ आणि भायखळा स्थानकांवर संपतील/सुटतील.

३. हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन उपनगरीय सेवा वडाळा रोड स्टेशनवर संपतील/सुटतील.

मुख्य मार्गावरील ब्लॉकपूर्वीच्या शेवटच्या लोकलची माहिती :

- कर्जतसाठी डाऊन धीमी मार्गावर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.१२ वाजता सुटेल आणि कर्जत येथे ०२.३३ वाजता पोहोचेल.

- अप धीम्या मार्गावर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता – डोंबिवली येथून २२.४८ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ००.१० वाजता पोहोचेल.

मुख्य मार्गावरील ब्लॉकनंतरच्या पहिल्या लोकलची माहिती :

- डाऊन धीमी मार्गावर - कर्जतसाठी - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०४.४७ वाजता सुटेल आणि कर्जत येथे ०७.०८ वाजता पोहोचेल.

- अप धीम्या मार्गावर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कल्याणसाठी ०३.२३ वाजता सुटेल आणि कल्याण येथे ०४.५६ वाजता पोहोचेल.

हार्बर मार्गावरील ब्लॉकपूर्वीच्या शेवटच्या लोकलची माहिती :

- पनवेलसाठी डाऊन मार्गावर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.१३ वाजता सुटेल आणि पनवेल येथे ०१.३३ वाजता पोहोचेल.

- अप मार्गावर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी पनवेल येथून २२.४६ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ००.०५ वाजता पोहोचेल.

हार्बर मार्गावरील ब्लॉकनंतरच्या पहिल्या लोकलची माहिती :

- डाऊन मार्गावर - पनवेलसाठी - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०४.५२ वाजता सुटेल आणि पनवेल येथे ०६.१२ वाजता पोहचेल.

- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी अप मार्गावर - वांद्रे टर्मिनस येथून ०४.१७ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०४.४८ वाजता पोहचेल.

दादर येथे अप मेल/एक्सप्रेस गाड्यांचा अल्पकालीन स्थगिती :

१. 12052 मडगाव- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस दि. २७.०१.२०२५ रोजी सुटलेली.

२. 11058 अमृतसर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस दि. २६.०१.२०२५ रोजी सुटलेली.

३. 22120 मडगाव- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तेजस एक्सप्रेस दि. २७.०१.२०२५ रोजी सुटलेली.

४. 11020 भुवनेश्वर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस दि. २६.०१.२०२५ रोजी सुटलेली.

हे ब्लॉक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आवश्यक आहेत. या ब्लॉकदरम्यान प्रवाशांनी सहकार्य करावे अशी विनंती रेल्वे प्रशासनाने केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Gold Rate: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, १० तोळ्याच्या दरात ६००० रुपयांनी घसरण, आजचे दर किती?

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Mumbai Police News : आलिशान कारमधून आले अन् टपरी चालकाला उचलून नेलं, मुंबईतील २ पोलिसांना बेड्या

Maharashtra Politics: मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का, मराठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश|VIDEO

Abhijeet Khandkekar Wife: फेसबुकवर मैत्री नंतर लग्न केलं; कोण आहे अभिजीत खांडकेकरची पत्नी?

SCROLL FOR NEXT