Mega Block On Western Railway For 35 Days:  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local News: मुंबईकरांनो कृपया लक्ष असू द्या! पश्चिम रेल्वे मार्गावर ३५ दिवसांचा ब्लॉक, आताच करा प्रवासाचे नियोजन

Mega Block On Western Railway For 35 Days: गोरेगाव आणि कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गाच्या विस्तारासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Priya More

पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर ३५ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. गोरेगाव आणि कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गाच्या विस्तारासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. २७ ऑगस्ट म्हणजे मंगळवारी रात्रीपासून या ब्लॉकला सुरूवात होणार आहे. या ब्लॉक कालावधीमध्ये लोकलसेवा, मेल एक्स्प्रेसवर परिणाम होणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवासाचे नियोजन करावे लागणार आहे.

पश्चिम रेल्वेवर घेण्यात येणाऱ्या ३५ दिवसांच्या ब्लॉक कालावधीमध्ये ५ दिवस १० तासांचा पॉवर ब्लॉक असणार आहे. या ब्लॉक कालावधीमध्ये जवळपास ६७० ते ७०० रेल्वेसेवा प्रभावित होणार आहेत. त्याचसोबत ब्लॉक कालावधीमध्ये ९६० लोकल फेऱ्यांवर परिणाम होणार आहे. महत्वाचे म्हणजे गणेशोत्सवाच्या १० दिवसांच्या काळामध्ये गणेशभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही, असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे गणेशभक्तांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर गोरेगाव आणि कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गाचा विस्तार केला जाणार आहे. मालाड रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला सहाव्या मार्गिकेसाठी जागा नाही. त्यामुळे पश्चिमेला सहावी मार्गिका तयार करण्यात येणार आहे. या कामादरम्यान सहाव्या मार्गिकेची जोडणी अन्य मार्गिकेला देण्यासाठी पाच ठिकाणी कट अँड कनेक्शन करण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे, शनिवार आणि रविवारमध्ये असलेल्या ब्लॉक कालावधीत ही सर्व कामे करण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले की, 'वांद्रे टर्मिनस ते बोरिवली अशी पाचवी आणि सहावी मार्गिका बांधण्याची व्यापक कल्पना आहे. हा मेल/एक्स्प्रेस ट्रेनचा राष्ट्रीय कॉरिडॉर असेल, जो मुंबई उपनगरीय कॉरिडॉरपासून वेगळा असेल. सध्या पाचवी लाईन सुरू आहे. हा द्विदिश मार्ग म्हणून वापरला जातो. आता वांद्रे टर्मिनस ते गोरेगावपर्यंतचा दुसरा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. पण आता ती कापून जोडण्याची गरज आहे. कनेक्शन झाल्यानंतर कांदिवली ते बोरिवली दरम्यानच्या शेवटच्या टप्प्याचे काम सुरू केले जाईल. शहरातील गजबजलेल्या रेल्वे नेटवर्कला ५ नोव्हेंबर २०२३ रोजी उपनगरीय नेटवर्कमध्ये खार आणि गोरेगाव दरम्यान सुमारे ९ किलोमीटरचा अतिरिक्त ट्रॅक मिळाला.

आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकल्पामुळे प्रवाशांना, विशेषत: मुंबई उपनगरीय प्रवाशांना मोठा फायदा होईल. भविष्यात अतिरिक्त रेल्वे सेवांना परवानगी देऊन यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबई उपनगरीय विभागाची लाईन क्षमता वाढेल, गर्दी कमी होण्यास मदत होईल, वक्तशीरपणा सुधारेल आणि अधिक ट्रेन सेवा जोडल्या जातील.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Onion Crop : धुक्यामुळे कांदा पिक धोक्यात; रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकरी हवालदिल

VBA News : वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध! पाहा नेमकं काय आहे जाहीरनाम्यात | Video

Sneeze: शिंकताना डोळे का बंद होतात? जाणून घ्या एका क्लिकवर

Crime News : ३-३ गर्लफ्रेंड, महागडं गिफ्ट द्यायचं होतं; पठ्ठ्या थेट बँक लुटायला गेला, पण सगळा घोळ झाला!

Maharashtra News Live Updates: बारामतीत भाजपला मोठा धक्का; बड्या नेत्याचा शरद पवार गटात प्रवेश

SCROLL FOR NEXT