Mumbai Crime : मुंबई पुन्हा संतापजनक प्रकार; सुरक्षारक्षकाने अल्पवयीन मुलीवर बाथरुममध्ये केला अत्याचार

Mumbai Crime News : मुंबईत पुन्हा एकदा संतापजनक प्रकार घडला आहे. मुंबईत सुरक्षारक्षकाने अल्पवयीन मुलीवर बाथरुममध्ये अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईच्या ओशिवारा परिसरात ही घटना घडली आहे.
मुंबई पुन्हा संतापजनक प्रकार; सुरक्षारक्षकाने अल्पवयीन मुलीवर बाथरुममध्ये केला अत्याचार
Mumbai Crime : Saam tv
Published On

सचिन गाड, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : राज्यभरात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील काही दिवसांत राज्यातील विविध भागात महिला अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. या वाढत्या महिला अत्याचाराच्या विरोधात आज राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या दिवशीच मुंबईतून अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील ओशिवरामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या ओशिवारा परिसरात एका इमारतीच्या सुरक्षारक्षकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. १७ वर्षीय मुलीला बळजबरीने बाथरुममध्ये नेत बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ओशिवरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हा धक्कादायक प्रकार आहे. ३७ वर्षीय सुरक्षारक्षकाने केलेल्या संतापजनक कृत्यानंतर ओशिवरा परिसरात खळबळ उडाली आहे.

मुंबई पुन्हा संतापजनक प्रकार; सुरक्षारक्षकाने अल्पवयीन मुलीवर बाथरुममध्ये केला अत्याचार
Bhiwandi Crime: भिवंडीत अमानुष प्रकार; तीन वर्षीय चिमुरडीला दिले चटके,आश्रम संचालाकास अटक

या प्रकरणी पोलिसांनी ३७ वर्षीय सुरक्षारक्षकाला ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. बलात्कार आणि बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत करण्यात सुरक्षारक्षकाला अटक करण्यात आली आहे.

भारतीय न्याय संहिता कलम 64 आणि 74 तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण (पॉक्स) कायद्याच्या कलम 4,6 अंतर्गत आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी सुरक्षारक्षकावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आरोपीला कोर्टात हजर केलं. आता त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.

नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग

नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. नाशिकच्या सिडको परिसरात १० वर्षांच्या मुलीचा विनयभंग झाला आहे. खासगी क्लासेस घेणाऱ्या शिक्षकानेच विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नाशिकच्या उपेंद्र नगर येथील एका क्लासेसमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

मुंबई पुन्हा संतापजनक प्रकार; सुरक्षारक्षकाने अल्पवयीन मुलीवर बाथरुममध्ये केला अत्याचार
Nashik Crime : धक्कादायक! नाशिकमध्ये १० वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग, शिक्षक अटकेत

इयत्ता पाचवीत शिकणारी मुलीला वर्गात एकटी पाहून शिक्षकाने अंगलट केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. शिकवणीवरून घरी आलेली मुलगी दुसऱ्या दिवशी जाण्यास नकार देत होती. शिकवणीला जाण्यास नकार देण्याचं कारण आईने विचारल्यानंतर पीडित मुलीने घडलेला प्रकार सांगितला. या सर्व प्रकारानंतर नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात विनयभंग आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संशयित शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com