Mumbai Metro : मेट्रोच्या कामामुळे 24 फुटांचा खड्डा, MMRCLने स्थानिकांना थेट फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हलवलं!

Mumbai Metro 7A : स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण झाले. खबरदारीचा उपाय म्हणून MMRCLने तेथील नागरिकांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हलवले.
Mumbai Metro 7A
Mumbai Metro 7A
Published On

संजय गडदे, साम प्रतिनिधी

Mumbai Metro 7A : मुंबई : अंधेरी परिसरातील सहार रोडवर सुरु असलेल्या मेट्रोच्या बोगद्याच्या कामादरम्यान (Mumbai Metro 7A) पी अँड टी कॉलनीतील रस्त्यावर तब्बल 24 फूट खोल खड्डा तयार झाला. भल्यामोठ्या खड्ड्यामुळे परिसरातील इमारतींना धोका निर्माण झाला. त्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. खबरदारीचा उपाय म्हणून MMRCLने तेथील नागरिकांना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हलवले.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून अंधेरी पूर्व गुंदवली मेट्रोस्थानात ते सहार विमानतळ दरम्यान मेट्रो 7 a मार्गाचे विस्तारीकरण सुरू करण्याचे काम आहे. यातील काही भाग हा भुयारी मार्गाने जोडला जाणार आहे. अंधेरी पूर्वेकडील सहार पी एन टी कॉलनी परिसरात टनेलिंगचे काम सुरू आहे. सहार पीएनटी कॉलनी येथे जमिनीखाली मोठ्या यंत्राच्या साह्याने टनेलिंगचे काम सुरू असताना शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अचानक जमिनीला मोठे भगदाड पडले. या भगदाडाचा व्यास तीन मीटर इतका तर खोली साधारणपणे आठ मीटर पेक्षाही अधिक होती. या ठिकाणी पीएनटी कॉलनीत राहणारे पोस्ट कर्मचारी आणि बीएसएनएल कर्मचारी यांचे वास्तव्य आहे. रात्रीचे जेवण झाल्यानंतर या ठिकाणी लहान मुले आणि काही महिला शतपावली करत असताना हा खड्डा पडला. यामुळे कॉलनीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Mumbai Metro 7A
VIDEO : ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका! लवकरच धावणार 'रिंग मेट्रो'

पी एन टी कॉलनीमध्ये साधारणपणे 100 पेक्षा अधिक कुटुंबे वास्तव्यास आहेत. हे टनेलिंग चे काम सुरू झाल्यापासून येथील इमारतींना हादरे देखील बसत आहेत. महत्त्वाचे म्हणजे या इमारती देखील जुनाट झाल्यामुळे इमारतींना अगोदरच तडे गेले आहेत. अशातच या कामावेळी हादरे बसत असल्यामुळे नागरिकांमध्ये देखील आता भीतीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी अचानक भगदाड पडल्यामुळे रहिवाशांनी रस्त्यावर उतरून एमएमआरसीएल विरोधात आंदोलन केले. यामुळे रहिवाशांना तात्पुरते परिसरातील एका हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा केली. मात्र आता रहिवाशांना पुन्हा आपल्या इमारतीमध्ये राहण्याची वेळ आली आहे. रहिवाशांनी आवाज उठवल्यामुळे एमएमआरसीएल कडून त्वरित हे पडलेले भगदाड बुजवण्याचे काम पूर्ण करण्यात आले. यासाठी 25 मिक्सर इतक्या काँक्रीटचा वापर देखील झाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात भगदाड पडल्यामुळे रहिवाशांनी एम एम आर सी एल प्रशासना विरोधात नाराजी व्यक्ती केली आहे.

Mumbai Metro 7A
Thane-Pune Metro: केंद्र सरकारचं महाराष्ट्राला मोठं गिफ्ट; पुणे-ठाण्यातील नव्या मेट्रो प्रोजेक्टला मंजुरी

मुळात हे काम करत असताना इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे अपेक्षित होते. मात्र असा कुठलाही प्रकार प्रशासनाकडून करण्यात आलेला नाही. बेस्ट किंवा बीएसएनएल प्रशासनाकडून परवानगी न घेताच काम सुरू केलं का? अशी शंका देखील रहिवाशांकडून व्यक्त केली आहे. असा प्रकार त्या झोपडपट्टी परिसरात झाला तर मात्र मोठी हानी होऊ शकते असा अंदाज देखील त्या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांकडून व्यक्त केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com