Megablock on Sunday Saam tv
मुंबई/पुणे

Megablock on Sunday: मुंबईकरांनो, आज तिन्ही मार्गावर रेल्वेचा मेगाब्लॉक; जाणून घ्या कुठे आणि कधी? वाचा सविस्तर

मेगाब्लॉक हा रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत असणार आहे.

Vishal Gangurde

Megablock News: उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी 23 जून २०२३ रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉक हा रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत असणार आहे. (Latest Marathi News)

मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी ११.०५ ते दुपारी ०३.५५ पर्यंत माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ०३.३५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

तसेच त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. ठाण्याच्या पुढे या जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. तसेच नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल.

ठाणे येथून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्यानंतर त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील. त्यानंतर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने पोहोचेल.

हार्बर मार्गावर कसा असेल मेगाब्लॉक ?

पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत मेगाब्लॉक असेल. मात्र, बेलापूर/नेरुळ - खारकोपर मार्गावर मेगाब्लॉक नसेल.

पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेल करीता जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

या भागात विशेष लोकल धावतील

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी भागात विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे - वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असतील. ब्लॉक कालावधीत बेलापूर - खारकोपर आणि नेरुळ - खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking Video: बापरे बाप... चक्क काकूंनी सापांना कपड्यांसारखे धु धु धुतले; व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल...

Vastu Tips: वास्तुनुसार 'या' मूर्ती घरात ठेवा, सुख शांती मिळेल

Maharashtra News Live Updates: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला देवेंद्र फडणवीस यांचं समर्थन

Winter Drinks: हिवाळ्यात हे आरोग्यदायी पेय प्या आणि शरीराला ठेवा उबदार

असंख्य घरांमध्ये लपलीये एक मांजर; तुम्ही १० सेकंदात शोधून दाखवाच!

SCROLL FOR NEXT