Western Railway Megablock  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Local News: पश्चिम रेल्वे मार्गावर आजपासून ३५ दिवसांचा ब्लॉक, ७०० लोकलफेऱ्या रद्द; प्रवाशांचे हाल

Western Railway Mega Block: पश्चिम रेल्वे मार्गावर २७ ऑगस्ट ते ६ ऑक्टोबर या कालावधीमध्ये हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल आणि रेल्वे सेवेवर मोठा परिणाम होणार आहे.

Priya More

पश्चिम रेल्वे मार्गावर आजपासून पुढचे ३५ दिवस मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. गोरेगाव ते कांदिवली रेल्वे स्थानकादरम्यान सहाव्या मार्गिकेच्या विस्तारासाठी पश्चिम रेल्वे मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. २७ ऑगस्ट ते ६ ऑक्टोबर या कालावधीमध्ये हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल आणि रेल्वे सेवेवर मोठा परिणाम होणार आहे. या मेगाब्लॉकमुळे परिणामी अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहे. अशामध्ये प्रवासाचे नियोजन करूनच नागरिकांना ३५ दिवस प्रवास करावा लागणार आहे.

पश्चिम रेल्वेवर घेण्यात येणाऱ्या ३५ दिवसांच्या ब्लॉक कालावधीमध्ये ५ दिवस १० तासांचा पॉवर ब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉक कालावधीमध्ये जवळपास ६७० ते ७०० लोकलफेऱ्या रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. गोरेगाव ते कांदिवली सहाव्या मार्गीकेच्या कामासाठी विकेंडला ५ मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या प्रत्येक मेगाब्लॉकला १३० ते १४० लोकलफेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. हे मेगाब्लॉक १० तासांचे असणार आहेत. तसंच, मेगाब्लॉकचा कालावधी सुरू झाल्यानंतर ५ व्या, १२ व्या, १९ व्या, २६ व्या आणि ३३ व्या दिवशी हे ब्लॉक घेतले जाणार आहेत.

महत्वाचे म्हणजे गणेशोत्सवाच्या १० दिवसांच्या काळामध्ये गणेशभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही. ११ ते १७ सप्टेंबर या कालावधीमध्ये सहाव्या मार्गिकेचे काम बंद ठेवण्यात येणार आहे., असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे गणेशभक्तांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सध्या लांबपल्ल्यांच्या गाड्यांसाठी अप आणि डाऊन अशी एकच मार्गिका सुरू आहे. सहाव्या मार्गिचे काम पूर्ण झाल्यानंतर लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी अतिरिक्त मार्गिका मिळणार आहे. उशिराने धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेस बऱ्याच वेळा लोकलच्या मार्गिकेवरून चावल्या जातात. त्यामुळे लोकलसेवेचा खोळंबा होता. पण सहावी मार्गिका सुरू झाल्यानंतर लोकलचा खोळंबा होणार नाही.

पश्चिम रेल्वे मार्गावर गोरेगाव आणि कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गाचा विस्तार केला जाणार आहे. मालाड रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला सहाव्या मार्गिकेसाठी जागा नाही. त्यामुळे पश्चिमेला सहावी मार्गिका तयार करण्यात येणार आहे. या कामादरम्यान सहाव्या मार्गिकेची जोडणी अन्य मार्गिकेला देण्यासाठी पाच ठिकाणी कट अँड कनेक्शन करण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे, शनिवार आणि रविवारमध्ये असलेल्या ब्लॉक कालावधीत ही सर्व कामे करण्यात येणार आहेत.

मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सांताक्रुझ- गोरेगावदरम्यानच्या सहाव्या मार्गिकेच्या कामामुळे २५०० पेक्षा अधिक लोकल रद्द करण्यात आल्या होत्या. आता गोरेगाव ते कांदिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम आजपासून सुरू झाले आहे. या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर लोकल गाड्या वेळेवर धावतील. लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका मिळल. उपनगरीय वाहतुकीवर या गाड्यांचा ताण येणार नाही. जास्त रेल्वे चालवण्यासाठी अतिरिक्त मार्ग उपलब्ध होतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : दुपारी उन्हाचा चटका, पहाटे गारठा, वाचा राज्यातील हवामानाचा अंदाज

IRCTC App: रेल्वे प्रवाशांचं काम झटक्यात अन् सोपं होणार, तिकीट बुकिंगपासून सगळ्या सुविधा एकाच अ‍ॅपवर

मोठी कारवाई! अमरावतीमध्ये तब्बल ६ कोटींचे सोनं-चांदी जप्त, नागपूरवरुन निघालेल्या गाडीत सापडले घबाड!

Maharashtra Election : ऐन निवडणुकीत बेधडक कारवाई, एकनाथ शिंदेंनी बंडखोर महेश गायकवाड यांच्यासह १० जणांची केली हकालपट्टी!

Todays Horoscope: काही राशींची आर्थिक अडचण होईल दूर, तर काहींच्या नात्यात होईल वाद, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT