Mumbai Local Mega Block Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local Mega Block: रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्यापूर्वी वाचा वेळापत्रक

Mumbai Local Mega Block On 15 Dec 2024: मध्य रेल्वे मार्गावर रुळांची दुरुस्ती, अभियांत्रिकी आणि देखभाल तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक बिघाडाची कामं करण्यासाठी 15 डिसेंबर म्हणजे रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Priya More

मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. 15 डिसेंबर म्हणजेच रविवारी तुम्ही लोकलने प्रवास करण्याचा प्लॅन करत असाल तर घराबाहेर पडण्यापूर्वी लोकलचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा. नाही तर तुम्हाला प्रवासादरम्यान त्रास सहन करावा लागेल. कारण 15 डिसेंबर म्हणजे रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावर रुळांची दुरुस्ती, अभियांत्रिकी आणि देखभाल तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक बिघाडाची कामं करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या विद्याविहार आणि ठाणे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर हार्बर मार्गावर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावर असा राहिल मेगाब्लॉक -

विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या लाईनवर सकाळी 8 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पुढील मेल/एक्स्प्रेस गाड्या ठाणे येथे अप जलद मार्गावर वळवल्या जातील.

लोकमान्य टिळक टर्मिनस कडे जाणाऱ्या रेल्वे विद्याविहार स्थानकावर सहाव्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि गंतव्यस्थानावर १० ते १५ मिनिटे उशीरा पोहोचेल.

- ट्रेन क्रमांक 11010 पुणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सिंहगड एक्सप्रेस

- ट्रेन क्रमांक 12124 पुणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन

- ट्रेन क्रमांक 13201 पटणा- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

- ट्रेन क्रमांक 17221 काकीनाडा - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

- गाडी क्रमांक 12126 पुणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रगती एक्सप्रेस

- ट्रेन क्रमांक 12140 नागपूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस

- ट्रेन क्रमांक 22226 सोलापूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्सप्रेस

डाऊन मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे डायव्हर्जन खालील डाऊन मेल/एक्स्प्रेस विद्याविहार स्थानकावर डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि पाचव्या मार्गावर ठाणे येथे वळवण्यात येतील आणि गंतव्यस्थानावर १० ते १५ मिनिटे उशीरा पोहोचेल.

- ट्रेन क्रमांक 11055 लोकमान्य टिळक टर्मिनस - गोरखपूर एक्सप्रेस

- गाडी क्रमांक 11061 लोकमान्य टिळक टर्मिनस - जयनगर पवन एक्सप्रेस

- ट्रेन क्रमांक 16345 लोकमान्य टिळक टर्मिनस - तिरुवनथपुरम नेत्रावती एक्सप्रेस

हार्बर रेल्वे मार्गावर असा राहिल मेगाब्लॉक -

पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 पर्यंत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर असा राहिल मेगाब्लॉक -

पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि

ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 पर्यंत पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी भागावर विशेष लोकल चालवण्यात येतील.

ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.

ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असेल.

हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नागपुरात खळबळ! हॉस्पिटलमध्येच डॉक्टर मृतावस्थेत आढळले; मृतदेहाजवळ सापडलेली 'ती' गोष्ट पाहून पोलीसही चक्रावले

Shiv Sena : आणखी एक बंडखोर शिंदेसेनेत, परंतु थेट पक्षात प्रवेश नाही;पाहा नेमकं काय?

Omraje Nimbalkar : ओमराजे निंबाळकर का फुटले? एकनाथ शिंदेंचा नेमका प्लान काय? पाहा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra News Live Update: लातूर जिल्ह्यातल्या सर्व शाळा सकाळच्या सत्रात, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, जून संपत आला तरी उन्हाचा पारा कमी होईना

Tuesday Horoscope: कामगारांसाठी खुशखबर मिळणार, या 5 राशींच्या व्यक्तींवर धनवर्षाव होणार; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT