Shiv Sena : आणखी एक बंडखोर शिंदेसेनेत, परंतु थेट पक्षात प्रवेश नाही;पाहा नेमकं काय?

Gokul Gite, Eknath Shinde : विधान परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या गोकुळ गिते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला. मात्र, त्यांनी थेट शिवसेनेत प्रवेश न करता 'सहयोगी सदस्य' म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSaam tv
Published On

Gokul Gite supports Eknath Shinde after MLC victory : विधान परिषद निवडणुकीतील नवनिर्वाचित आमदार गोकुळ गिते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून ते शिंदे गटात (शिवसेनेत) सामील झाले आहेत. मात्र, त्यांचा थेट पक्षात प्रवेश झालेला नाही. गोकुळ गिते हे थेट शिवसेनेत प्रवेश न करता, येणाऱ्या काळात शिवसेनेचे 'सहयोगी सदस्य' म्हणून काम पाहणार आहेत. काही तांत्रिक कारणांमुळे त्यांचा थेट पक्षप्रवेश झालेला नाही.

गोकुळ गिते यांनी सांगितले की, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाच्या पद्धतीमुळे आणि त्यांच्या स्टॅमिनामुळे पूर्वीपासूनच प्रभावित होते, म्हणूनच त्यांनी हा निर्णय घेतला. निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाला असून गोकुळ गिते विजयी झाले आहेत. यावर बोलताना श्रीकांत शिंदे म्हणाले की, "निवडणुकीत यश-अपयश येत असते. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्दामुळे महायुतीचा उमेदवार शेवटपर्यंत बदलला नाही. परंतु, उमेदवाराबद्दल प्रचंड नाराजी होती, जी निकालातून स्पष्ट झाली आहे."

Eknath Shinde
नवी मुंबई हादरली! दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींना ढकलले वेश्याव्यवसायात; शिंदेसेना आणि भाजप नेत्याला बेड्या

"हा प्रवेश कोणत्याही वैयक्तिक कमिटमेंट किंवा अटींवर झालेला नाही. केवळ एकनाथ शिंदे यांच्यावरील विश्वास आणि त्यांच्या कामाप्रती असलेल्या कमिटमेंटमुळेच लोक शिवसेनेत येत आहेत," असे श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.या भेटीदरम्यान गोकुळ गिते यांच्यासोबत उदय सामंत, उमेश पाटील, सूर्यवंशी, रघुवंशी आणि आमदार किशोर आप्पा पाटील हे नेते उपस्थित होते.

Eknath Shinde
नवी मुंबई हादरली! दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींना ढकलले वेश्याव्यवसायात; शिंदेसेना आणि भाजप नेत्याला बेड्या

श्रीकांत शिंदे यांनी शेवटी प्रतिक्रिया देताना सांगितले की, "आज सहा खासदारांच्या प्रवेशानंतर हा दुसरा मोठा धमाका आहे आणि येत्या काळात असे धमाके होतच राहतील, हा तर फक्त ट्रेलर आहे." दरम्यान सोमवारी ठाकरेंच्या ६ बंडखोर खासदारांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. तर सायंकाळी गोकुळ गिते यांनी शिंदेंना पाठिंबा दिला.

Eknath Shinde
Omraje Nimbalkar : ओमराजे निंबाळकर का फुटले? एकनाथ शिंदेंचा नेमका प्लान काय? पाहा स्पेशल रिपोर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com