AC Local Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local: एसी लोकलच्या पेंटाग्राफमध्ये बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Priya More

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंब्रा ते दिवा स्थानकादरम्यान दादर-बदलापूर एसी लोकलच्या पेंटाग्राफमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे प्रशासनाकडून दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लोकल वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दादर- बदलापूर एसी लोकलमध्ये १२ वाजून १० मिनिटानी बिघाड झाला. मुंब्रा ते दिवा स्थानकादरम्यान एसी लोकल बंद पडली. एसी लोकलच्या पेंटाग्राफमध्ये बिघाड झाला. त्यामुळे मध्य रेल्वेची डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ही लोकल एकाच ठिकाणी थांबल्यामुळे त्यामागे दोन लोकल देखील थांबून आहेत.

दरम्यान, मध्य रेल्वेकडून तत्काळ दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. पेंटाग्राफमधील बिघाडामुळे काही काळ डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र तातडीने केलेल्या दुरुस्तीमुळे लोकल सेवा पुन्हा सुरळीत झाली आहे. दादरहून बदलापूरकडे जाणारी एसी लोकल अखेर बदलापूरच्या दिशेने रवाना झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Maharashtra News Live Updates: राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! बँकेच्या कर्मचाऱ्यांना आजीवन मिळणार १०००० रुपये पेन्शन

Mumbai local train update : मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य आणि ट्रान्स हार्बरवर विशेष पॉवर ब्लॉक; अनेक लोकल फेऱ्या रद्द, वाचा वेळापत्रक

Maharashtra Assembly Elections: ठाकरे - शरद पवार गटात जागावाटपावरून तिढा? 20 जागांवर अडकली मविआची गाडी? मुंबईतल्या बैठकीत काय झाली चर्चा?

Salman khan: सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर वाढवली सुरक्षा व्यवस्था, लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने आली होती धमकी

SCROLL FOR NEXT