Salman khan: सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर वाढवली सुरक्षा व्यवस्था,  लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने आली होती धमकी
Salman khan Residence Security

Salman khan: सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर वाढवली सुरक्षा व्यवस्था, लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने आली होती धमकी

Salman khan Residence Security : धमकी प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेरील सुरक्षा यंत्रणा वाढवण्यात आलीय.
Published on

संजय गडदे, साम प्रतिनिधी

अभिनेता सलमान खानच्या घराबाहेरील सुरक्षा वाढविण्यात आलीय. अभिनेता सलमान खान याचे वडील निर्माता सलीम खान यांना मिळालेल्या कथित धमकी प्रकरणानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. मुंबई पोलिसांकडून सलमान खान यांच्या वांद्रे पश्चिमेकडील गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.

एक बुरखाधारी महिलेने सलमान खानचे वडील सलीम खान यांना धमकी दिल्याची घटना सकाळी घडली होती. लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी अज्ञात महिलेविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बँडस्टँड परिसरात सलीम खान मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. त्यावेळी स्कुटीवरून एक बुरखाधारी महिला त्यांच्या जवळ आली तिने को भेजू क्या?, अशा शब्दांत धमकी दिली.

यापूर्वी लॉरेन्स बिश्नोईकडून सलमान खानला देखील धमकी देण्यात आल्या आहेत. दरम्यान वांद्रे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत सकाळी बाईक चालकाला अटक केली होती. यानंतर आता धमकी देणाऱ्या महिलेला देखील अटक केली आहे.

Salman khan: सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर वाढवली सुरक्षा व्यवस्था,  लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने आली होती धमकी
Salman - Aishwarya Viral Video: सलमान, ऐश्वर्या आणि आराध्याचा 'तो' व्हिडीओ का होतोय व्हायरल?.. जाणून घ्या प्रकरण

यानंतर पोलिसांकडून सलमान खानच्या घराबाहेर सुरक्षा यंत्रणा वाढवलीय. या ठिकाणी डेल्टा आणि रिझर्व अशा दोन अतिरिक्त वाहने या ठिकाणी उभ्या केल्या आहेत. यापूर्वी सलमान खानला पोलिसांकडून झेड प्लस सुरक्षा देखील देण्यात आली होती आता धमकी आणि सलमान खानच्या ताब्यात घुसलेला व्यक्ती या घटनेमुळे पोलिसांकडून सलमानच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलीय.

सलमान खान वांद्रे येथील त्याच्या घरी जात असताना गॅलेक्सी अपार्टमेंट येथे हा धक्कादायक प्रकार घडला. सलमानच्या ताफ्यात एक अज्ञात व्यक्ती शिरल्याची घटना सकाळी घडली होती. दरम्यान पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती मेहबूब स्टुडिओ ते गॅलेक्सी अपार्टंमेटदरम्यान सलमान खानच्या ताफ्यासोबत बाईकवरून जात होता. ही गोष्टी सुरक्षा रक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी संशयित व्यक्तीची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या दुचाकीस्वाराला गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर पकडलं.

पनवेलच्या फार्म हाऊसवर सलमानच्या हत्येचा कट

सलमान खानच्या घरावर २ जणांनी १४ एप्रिलला पहाटे वांद्रातील गॅलेक्सी अपार्टमेंटवर अंदाधुंद गोळीबार केला होता. या प्रकरणात आतापर्यंत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ६ जणांना अटक केली होती. गॅलेक्सी अपार्टमेंटवर हल्ला करण्यापूर्वी चौघांनी सलमान खानच्या पनवेल फार्म हाऊस आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसराची रेकी केली होती.

पनवेलच्या फार्म हाऊसवर हल्ला करण्याची योजना या हल्लेखोरांनी आधी आखली होती. लॉरेन्स बिश्नोई, अनमोल बिश्नोई, गोल्डी ब्रार यांनी सलमान खानवर हल्ल्याचा कट रचण्यासाठी AK-47, M-16, AK-92 यांसारखी स्वयंचलित हत्यारं पाकिस्तानात आणण्यात आली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com