Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

Horoscope Rashifal 20 September 2024: ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, 20 सप्टेंबर काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे तर काहींना आयुष्यात छोट्या-छोट्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. चला जाणून घेऊया 20 सप्टेंबर 2024 रोजी कोणत्या राशींना फायदा होईल आणि कोणत्या राशीच्या लोकांना काळजी घ्यावी लागेल.
शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य
Friday HoroscopeSaam Tv
Published On

मेष - मेष राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला जाईल. आज तुम्ही कर्जाची परतफेड करू शकाल. वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. काही लोकांचे विवाह निश्चित होऊ शकतात. प्रवासाची शक्यता आहे. आज तुम्हाला भेट म्हणून मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ- आज तुमचे आरोग्य सुधारेल. ऑफिसमधील काम वेळेवर पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. सुट्टीत कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची शक्यता आहे. अविवाहित लोकांच्या आयुष्यात एक विशेष व्यक्ती प्रवेश करू शकते. आर्थिक आणि आरोग्य तुमच्या अनुकूल राहील.

मिथुन - आज तुम्हा प्रत्येक गोष्टीत काळजी घ्यावी आज. सध्या गुंतवणूक करणे टाळा, अन्यथा तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. व्यावसायिकांसाठी दिवस शुभ राहणार आहे. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते.

कर्क - आजचा दिवस तुमच्यासाठी आर्थिक लाभाचे संकेत देत आहे. व्यापारी चांगला नफा कमावण्यात यशस्वी होऊ शकतात. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडाल, मग ते वैयक्तिक असो किंवा व्यावसायिक. तुम्हाला कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळू शकते.

सिंह - आज तुम्ही नवीन काम सुरू करण्यात यशस्वी होऊ शकता. काही लोक त्यांच्या बँकेचे कर्ज फेडण्यात यशस्वी होतील. कार्यालयात वादापासून दूर राहा. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. काही विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते.

कन्या - आज कुटुंबातील सदस्याच्या तब्येतीत सुधारणा होईल. ऑफिसमध्ये तुम्हाला तुमचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळू शकते. वरिष्ठ प्रभावित होऊन तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या देऊ शकतात. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस चांगला जाणार आहे. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

तूळ - आज तुमची आर्थिक स्थिती स्थिर राहणार आहे. वाहन वापरताना सावधगिरी बाळगा, अन्यथा जखमी होण्याची शक्यता आहे. पैशाच्या बाबतीत अज्ञात लोकांवर विश्वास ठेवू नका. आज तुम्ही तुमच्या भावाला किंवा बहिणीला आर्थिक मदत करण्यासाठी पुढे येऊ शकता. तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळू शकते.

वृश्चिक - आज तुम्हाला अनपेक्षित स्त्रोताकडून पैसे मिळू शकतात. आज तुम्हाला कुटुंबात तुमची बाजू मांडण्याची संधी मिळू शकते. ऑफिसमध्ये टीम मीटिंगमध्ये तुमच्या कल्पना शेअर करायला अजिबात संकोच करू नका. आज तुम्हाला गुंतवणुकीचे चांगले पर्याय मिळू शकतात. मात्र आर्थिक तज्ञाचा सल्ला घेणं फायदेशीर ठरू शकतं.

धनु - जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर आधी संपूर्ण माहिती घेणं आवश्यक आहे. आज काही लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस सामान्य राहणार आहे. मालमत्तेशी संबंधित कोणताही वाद मिटण्याची शक्यता आहे.

मकर - आज तुम्हाला पुरेशी रक्कम जमा करण्यात यश मिळेल. ऑफिसमध्ये तुमची कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त तास काम करावे लागू शकते. जमीन, इमारत, वाहन खरेदीची शक्यता आहे. कुटुंबासोबत वेळ घालवाल.

कुंभ - आज वडिलधाऱ्यांचा मौल्यवान सल्ले तुम्हाला पैसे कमविण्यास लाभदायक ठरू शकतात. आज तुमचे आरोग्य चांगले राहणार आहे. कुटुंबातील एखाद्या लहान सदस्याकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. ऑफिसमध्ये तुमचे नेतृत्व कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. आई-वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या.

मीन - आज पैशाशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नाही. प्रवासात वाद टाळा. तुमचे मन एखाद्या गोष्टीबद्दल चिंताग्रस्त राहू शकते. मानसिक तणाव असू शकतो. कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवा. कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करणे टाळा.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com