Mumbai Local Train Update Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Local Train: मुंबई लोकलमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट, एक टीप अन् पोलिसांनी खेळ संपवला!

Mumbai Crime: गर्दीचा फायदा घेत मोबाइल चोरणाऱ्या टोळीचा रेल्वे पोलीस गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहे.गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीवरून रेल्वे पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिजीत देशमुख,साम टीव्ही

रेल्वे आणि बसमध्ये चढताना आणि उतरताना गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे मोबाईल चोरी करणाऱ्या दोन चोरट्यांना कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने अटक केली आहे. चिन्ना पुसला आणि अशोक आवुला अशी या चोरट्यांची नावे असून,त्यांच्याकडून 42 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या विरोधात २३ गंभीर गुन्हे असल्याची नोंद आहे.

गेल्या काही दिवसांपासून रेल्वे स्टेशन आणि बस डेपो परिसरात मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे कल्याण रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकाने संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेऊन होते. दरम्यान चोरटे कल्याण पूर्व बाजूने रेल्वे स्टेशन परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना त्यांच्या खात्रीशीर सूत्रांकडून मिळाली होती.

रेल्वे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय खेडकर आणि पोलीस निरीक्षक रोहित सावंत यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी कल्याण स्टेशन परिसरात सापळा रचला. संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या दोन जणांच्या मुसक्या आवळल्या आणि चौकशीत ते मोबाईल चोर असल्याचे उघड झाले.

चिन्ना पुसला हा कर्नाटकातील हुबळीचा रहिवासी असून व अशोक आवुला हा तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील आहे. हे दोघे महाराष्ट्रात येऊन रेल्वे स्टेशन आणि बस डेपो परिसरात मोबाईल चोरी करत होते. चोरी केलेले मोबाईल ते गावाला परत जात आणि तेथील बाजारात विक्री करायचे.

या कारवाईत पोलिसांना या अट्टल चोरांकडून 42 मोबाईल सापडले असून आणखी काही मोबाईल मिळण्याची शक्यता आहे. तसेच या दोघांवर कल्याण आणि परिसरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.

रेल्वे आणि बसमध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या टोळ्यांविरोधात आम्ही कठोर कारवाई करत आहोत. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मोबाईलची काळजी घ्यावी आणि संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे.असे आवाहन यावेळी कल्याण रेल्वे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विजय खेडकर यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

Maharashtra Live News Update: वाशिम शहरातील गणेश पेठ येथे घराला अचानक आग

SCROLL FOR NEXT