Viral Video: मुंबई लोकल ट्रेनमधील महिलांची अजब हाणामारी, मुंबईतील प्रवाशांमध्ये खळबळ, पाहा व्हायरल VIDEO

Viral Video On Local Train: मुंबई लोकलमध्ये प्रवास करत असताना महिलांमध्ये भांडण झाले. हे भांडण मिटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेला चपराक बसली. हा व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकांनाच धक्का बसला आहे.
Viral Video
Viral Videosaam tv
Published On

मुंबई लोकलमध्ये चढणे एक आव्हानात्मक काम आहे. स्टेशन कुठलेही असो, आणि वेळ कितीही उशिरा असो, गर्दी असाच वेगात वाढत जातो. डब्यात प्रवेश करण्याआधीच तुम्हाला ठरवावे लागते की कुठल्या बाजूने प्रवेश करायचा आहे. कारण, एक सेकंदाचा उशीर झाला तरी तुमची संधी गमावलीच समजा. अशा वेळी प्रवाशांमध्ये धक्काबुक्की होणे सामान्य आहे.

हळूहळू ही धक्काबुक्की हाणामारीत बदलते. गर्दीच्या परिस्थितीत असं घडणं अनेक वेळा सामान्य बनत जातं, ज्यामुळे लोकांमध्ये संघर्ष आणि असहमती निर्माण होतात. डोंबिवली स्टेशनवर एका लोकल डब्यातील महिलांमधील भांडण चांगलंच चिघळले आणि त्याचे रूप थेट प्लॅटफॉर्मवर पसरले. ट्रेनमधून उतरल्यावर महिलांनी हाणामारी सुरू केली.

Viral Video
Mumbai Local Mega Block: प्रवाशांचे मेगा हाल! मध्य, हार्बर, पश्चिम रेल्वेचा खोळंबा, नागरिकांची गैरसोय, स्थानकांवर गर्दीच गर्दी

त्यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे भांडण सोडवायला गेलेल्या दुसऱ्या महिलेला देखील काही चापट बसले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, लोक हसत हसत म्हणताहेत की मुंबईतल्या महिलांना आता पुरुषांपेक्षा महिलांपासूनच जास्त भिती वाटत आहे. स्टेशनवर झालेल्या या धक्कादायक घटनेने सोशल मीडियावर चर्चेला उधाण दिलं आहे आणि लोकांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Viral Video
Viral News: सिगरेट सोडण्यासाठी माणसाचा अतरंगी उपाय, डोकं पिंजऱ्यात बंद करून बायकोकडे दिली चावी, पाहा व्हायरल पोस्ट

हा व्हिडीओ 'domumbai_' या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला असून, १.७ मिलियन अधिक नेटकऱ्यांनी त्याला पाहिलं आहे. व्हिडीओमध्ये दोन महिलांमधील हाणामारी स्पष्टपणे दिसत आहे. कमेंट सेक्शनमध्ये काही नेटकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, ही घटना डोंबिवली किंवा कल्याण स्टेशनवर घडली आहे. सुरुवातीला या महिलांचं भांडण लोकल डब्यात सुरू झालं, पण प्लॅटफॉर्मवर उतरल्यावर त्यांचं भांडण तिथेच सुरू राहिलं. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Viral Video
Viral Video: केळ, चिकू आणि सफरचंद मिसळून बनवली 'चहा', VIDEO पाहून तुम्हीही डोक्याला हात माराल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com