Viral Video: केळ, चिकू आणि सफरचंद मिसळून बनवली 'चहा', VIDEO पाहून तुम्हीही डोक्याला हात माराल

Viral Video On Tea: वेळेला चहा हा सर्वांनाच लागतो. जो फक्त १० मिनिटांत तयार होतो. मात्र, काहीजण या साध्या रेसिपीत विचित्र प्रयोग करतात. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात चहावर अजब प्रयोग दिसतोय.
Viral Video
Viral Videosaam tv
Published On

आपल्यातील अनेक जणांचा दिवस चहा पिऊन सुरू होतो. चहाची रेसिपी अतिशय सोपी आहे. फक्त ५ मिनिटांत तुम्ही झटपट चहा तयार करू शकता. मात्र, काही लोक या साध्या रेसिपीत अजब प्रयोग करून पदार्थाची मजा घालवतात. असाच एक विचित्र प्रयोग एका व्हिडीओमध्ये पाहायला मिळतो.

या व्यक्तीनं चहामध्ये केळं, सफरचंद आणि चिकू असे अनोळखी घटक मिसळले आहेत. हे पाहून कोणालाही धक्का बसेल. असा चहा कधी पाहिला नसेल, एवढं नक्की. या अतरंगी प्रकारानं चहाच्या चाहत्यांना विचार करायला लावलं आहे. ही अनोखी चहाची रेसिपी 'fittrwithrohit' या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे ही रेसिपी सूरत या ठिकाणाची आहे असे व्हिडीओमध्ये दिसत आहे आणि 'चहासाठी न्याय' असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

Viral Video
Viral Video: नेटकऱ्यांना भुरळ घालणारा माकडाचा व्हिडिओ व्हायरल , दोन पायांवर चालणारे माकड, पाहा VIDEO

विक्रेत्यानं एका भांड्यात दूध घेतले, त्यावर चमचाभर चहापती टाकली. साखर, केळं, चिकू आणि सफरचंद टाकले. शेवटी मसाला घालून सगळं मिश्रण चांगलं एकत्र केलं. अशा विचित्र पद्धतीने तयार झाले चहा. या अनोख्या प्रयोगाने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले असून, चहाच्या या नव्या रूपाने अनेक जणांना चकित केले आहे.

Viral Video
Viral Video: रसगुल्ला खायला आवडतोय? किळसवाणा व्हिडीओ पाहून डोकचं फिरेल

या अजब चहाचा व्हिडीओ ४ मिलियन अधिक नेटकऱ्यांनी पाहिला आहे, आणि यावर मिळालेल्या प्रतिक्रिया प्रचंड मजेशीर आहेत. काहींनी मॅगीनंतर आता लोकांनी चहांवर प्रयोग सुरू केल्याचं म्हटलं आहे, तर काहींच्या मते असा चहा पिण्यापेक्षा चहा न पिलेला चांगलं. एका युजरने तर अशा चहांसाठी नर्कामध्ये वेगळी शिक्षा असावी, असंही लिहिलंय. या अतरंगी चहांवर तुमचं मत काय आहे? तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया शेअर करा.

Viral Video
Viral Video: अरे देवा... गाजराचा हलवा समजून चुकून लाल भडक मिरच्या खाल्ल्यानंतर माकडाचे झाले हाल, पाहा व्हायरल VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com