Mumbai Local Mega Block on Sunday 4-5 november 2023 Central and Harbor Line SAAM TV
मुंबई/पुणे

Mumbai Mega Block: प्रवाशांनो लक्ष द्या! रविवारी रेल्वेच्या 'या' मार्गांवर मेगाब्लॉक; जाणून घ्या वेळापत्रक

Mumbai Local Mega Block: मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट आहे. शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी लोकलच्या दोन मार्गांवर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.

Satish Daud

Mumbai Local Mega Block News

मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी अपडेट आहे. शनिवारी मध्यरात्री आणि रविवारी लोकलच्या दोन मार्गांवर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. प्रवाशांनी ट्रेनचं वेळापत्रक पाहूनचं प्रवास करावा, असं आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेतर्फे मुख्य मार्गावर आज म्हणजेच शनिवारी रात्रीपासून मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात येणार आहे. तर रविवारी, ५ नोव्हेंबर रोजी हार्बर मार्गावरही मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान काही ट्रेन बंद असणार असून लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वेच्या भायखळा ते माटुंगा अप-डाऊन जलद (Mumbai Local News) मार्गावर शनिवारी मध्यरात्री १२.३५ ते पहाटे ४.४५ पर्यंत मेगाब्लॉक असेल. ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथे येणाऱ्या मेल/एक्स्प्रेस माटुंगा ते भायखळा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

तसेच दादर येथील फलाट क्र. तीनवर एक्स्प्रेसला दोनदा थांबा दिला जाईल. डाऊन मेल/एक्स्प्रेस भायखळा ते माटुंगा स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. दुसरीकडे हार्बर रेल्वे मार्गावरील कुर्ला ते वाशी अप-डाऊन मार्गावर रविवार सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल.

परिणामी ब्लॉकदरम्यान सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर आणि बेलापूर ते सीएसएमटी लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते कुर्ला दरम्यान विशेष लोकल धावतील. तसेच ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान लोकल वाहतूक सुरू राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Polls : तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll : शाहूवाडी मतदारसंघात जनसुराज्य शक्तीचा विजय? पाहा Exit Poll

Murtijapur Exit Poll: मुर्तिजापूर मतदारसंघातून कोण निवडून येणार? हरिश पिंपळे की सम्राट डोंगरदिवे? पाहा एक्झिट पोल

Relationship Tips: तुमच्या जोडीदाराला द्या 'या' रंगाचा रत्न, प्रेमात गोडवा वाढेल

Maharashtra Exit Polls: राजुरामध्ये अपक्ष उमेदवार वामनराव चटप होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT