वर्ल्डकपमध्ये आज पाकिस्तानचा सामना बलाढ्य न्यूझीलंड संघासोबत होणार आहे. सेमीफायनलच्या फेरीत आपली दावेदारी कायम ठेवण्यासाठी पाकिस्तानला या सामन्यात विजय मिळवणं आवश्यक आहे. त्यामुळे पाकिस्तानचा संघ सामन्यात पूर्णत: ताकदीने उतरणार आहे. मात्र, सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा झटका बसला असून बाबर आझमचं टेन्शन वाढलं आहे.
वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा थरार आता अंतिम टप्प्यात आला आहे. सेमीफायलनची फेरी गाठण्यासाठी प्रत्येक संघामध्ये चुरस रंगली आहे. शुक्रवारी अफगाणिस्तान विरुद्ध नेदरलँड यांच्यात रंगतदार सामना झाला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या सामन्यात अफगाणिस्तानने नेदरलँडचा 7 विकेट्सनी धुव्वा उडवला. दरम्यान, अफगाणिस्तानच्या विजयाने गुणतालिकेत मोठा उलटफेर झाला असून पाकिस्तानला जबर धक्का बसला आहे. या विजयासह अफगाणिस्तानच्या संघाला दोन गुण मिळाले आहेत.
त्यामुळे अफगाणिस्तानचे आता 8 गुण झाले असून त्यांनी गुणतालिकेत पाकिस्तानला पाचवे स्थान पटकावले आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचा संघ पिछाडीवर ढकलला गेला असून ते आता सहाव्या स्थानावर घसरले आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याआधी पाकिस्तानला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.
जर पाकिस्तानला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवता आला नाही तर त्यांना अफगाणिस्तानला पिछाडीवर ढकलता येणार नाही. पण जर त्यांनी विजय मिळवला तरीही कोणता संघ पुढे जाणार हे गुणतालिकेतील रन रेटवरून ठरणार आहे. त्यामुळे विजयाबरोबरही पाकिस्तानचा आता रन रेटचे मोठे टेंशन असणार आहे.
लखनऊच्या एकना स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात नेदरलँडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. परंतु त्यांचे फलंदाज मैदानात फार कमाल दाखवू शकले नाही. अफगाणिस्तानने नेदरलँडच्या 10 विकेट्स घेऊन त्यांना 179 वर रोखले.
नेदरलँडकडून सायब्रन्डनेच सर्वाधिक 58 धावा केल्या. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. मोहम्मद नबीने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. 180 धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानची सुरुवात धमाकेदार झाली. रहमत शाहने आणि हसमत्तुल्ला शाहिदीने अर्धशतकीय खेळी करत अफगाणिस्तानला 31.3 ओव्हरमध्येच 7 विकेट्सनी विजय मिळवून दिला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.