Mega Block x
मुंबई/पुणे

Mega Block: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी मध्य, हार्बर अन् ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक; वाचा वेळापत्रक

Central And Harbour Railway Mega Block Tommorow: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. उद्या मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे.

Siddhi Hande

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी

उद्या मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक

घराबाहेर पडण्याआधी वेळापत्रक वाचा

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. उद्या जर तुम्ही ट्रेनने कुठे जाणार असाल तर आधी रेल्वेचं वेळापत्रक चेक करा. उद्या मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि ट्रान्स हार्बर या मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात येणार आहेत. तर अनेक रेल्वेगाड्या या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी घराबाहेर पडण्याआधी ही माहिती वाचावी.

मध्य रेल्वेवर १६ नोव्हेंबर म्हणजे उद्या विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक असणार आहे. कोणत्या मार्गावर किती वेळ मेगा ब्लॉक असणार आहे ते वाचा.

मध्य रेल्वे (Central Railway Mega Block)

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार दरम्यान १०.५५ ते ३.५५ वाजेपर्यंत अप आणि डाउन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. सीएसएमटीवरुन १०.४८ ते ३.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील रेल्वे जलद मार्गावर वळवल्या जातील. या ट्रेन भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील त्यानंतर विद्याविहार स्थानकावर डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जातील.

घाटकोपर येथून १०.१९ ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या गाड्या विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील. या रेल्वे कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.

हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक (Harbour Line Mega Block)

पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान (पोर्ट मार्ग वगळून) अप आणि डाउन हार्बर मार्ग ११.०५ ते ४.०५ पर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. पनवेल येथून सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा १०.३३ ते १५.४९ पर्यंत आणि सीएसएमटीवरुन ९.४५ ते ३.१२ पर्यंत बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या डाउन हार्बर लाईन सेवा रद्द राहतील.

ट्रान्स-हार्बर मार्ग (Trans Harbour Mega Block)

पनवेलहून सुटणाऱ्या ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा ११.०२ ते ३.५३ पर्यंत रद्द असणार आहेत. ठाणे येथून सुटणाऱ्या पनवेलकडे जाणाऱ्या डाउन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा १०.०१ ते ३.२० पर्यंत रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी विभागात विशेष लोकल चालवल्या जातील. ब्लॉक काळात ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर लाईन सेवा उपलब्ध असतील. ब्लॉक काळात पोर्ट मार्ग उपलब्ध असतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: कोचकडून महिला खेळाडूवर बलात्कार, हॉटेलवर सरावासाठी बोलावलं अन्...; करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी

'V' Neck ब्लाउजची क्रेझ; साडीला देईल रॉयल लूक, पाहा ट्रेंडी डिझाइन्स

Maharashtra Live News Update: हिंगोलीच्या औंढा शहरात गटविकास अधिकाऱ्याची गाढवावरून प्रतिकात्मक धिंड

Viral Video : एकमेकींचे केस ओढले, रस्त्यात राडा घातला; प्रचाराचे पैसे न मिळाल्याने महिलांची फ्री स्टाईल हाणामारी

Navi Mumbai : नवी मुंबईच्या लॉजमध्ये नको ते उद्योग, पोलिसांनी उद्ध्वस्त केले देहविक्रीचं रॅकेट; ७ महिलांची सुटका

SCROLL FOR NEXT