Mega Block: रविवारी गरज असेल तरच बाहेर पडा! लोकल प्रवास होणार खडतर; मध्य- हार्बरवर मेगाब्लॉक, कधी आणि कुठे?

Central Railway Mega Block on Sunday 9th November: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे आणि हार्बर लाइनवर येत्या रविवारी मेगा ब्लॉक असणार आहे.
Mega Block: रविवारी गरज असेल तरच बाहेर पडा! लोकल प्रवास होणार खडतर; मध्य- हार्बरवर मेगाब्लॉक, कधी आणि कुठे?
Published On
Summary

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी

९ नोव्हेंबर रविवारी मध्य आणि हार्बर लाइनवर मेगा ब्लॉक

घराबाहेर पडण्याआधी रेल्वेचे वेळापत्रक वाचा.

मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेवर ९ नोव्हेंबर म्हणजेच रविवारी मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही रविवारी ट्रेनने प्रवास करणार असाल तर रेल्वेचं वेळापत्रक वाचून जा. मध्य रेल्वे मुंबई विभागामार्फत अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी उपनगरीय विभागात मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगा ब्लॉक कुठून कुठपर्यंत असणार आहे ते जाणून घ्या.

Mega Block: रविवारी गरज असेल तरच बाहेर पडा! लोकल प्रवास होणार खडतर; मध्य- हार्बरवर मेगाब्लॉक, कधी आणि कुठे?
Indian Railways Update: प्रवाशी मित्रांनो कृपया लक्ष द्या! कोणालाच नाही मिळणार तिकीट; चौकशी असो की बुकिंग, सर्व कामं असतील ठप्प

कोणत्या मार्गावर मेगा ब्लॉक (Railway Mega Block on Sunday 9th November)

माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ वाजेपासून १५.४५ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे.तर

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.३६ वाजल्यापासून ते १५.१० वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील गाड्या माटुंगा स्थानकात डाउन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबणार आहे.याचसोबत ट्रेन १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड स्थानकात पुन्हा डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

Mega Block: रविवारी गरज असेल तरच बाहेर पडा! लोकल प्रवास होणार खडतर; मध्य- हार्बरवर मेगाब्लॉक, कधी आणि कुठे?
Central Railway Accident : मध्य रेल्वेवर भीषण अपघात; आंदोलनामुळे गर्दी, फास्ट लोकलने उडवल्याने तिघांचा मृत्यू

ठाणे येथून सकाळी ११.०३ वाजल्यापासून ते १५.३८ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड स्थानकात अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या मुलुंड ते माटुंगा दरम्यान त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबतील आणि माटुंगा स्थानकात पुन्हा अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. या ट्रेनदेखील १५ मिनिटे उशिराने पोहचतील.

हार्बर मार्गावरही मेगा ब्लॉक (Harbour Line Mega Block)

कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप व डाउन हार्बर मार्गावर ११.१० ते १६.१० या वेळेत ब्लॉक राहील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून १०.३४ ते १५.३६ या वेळेत सुटणाऱ्या वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील गाड्या तसेच पनवेल/बेलापूर/वाशी येथून १०.१७ ते १५.४७ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईकडे येणाऱ्या अप हार्बर मार्गावरील गाड्या रद्द राहतील.

मेगा ब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई – कुर्ला तसेच पनवेल – वाशी या विभागांदरम्यान विशेष उपनगरी गाड्या चालवल्या जातील. ब्लॉक कालावधीत १०.०० ते १८.०० या वेळेत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे–वाशी/नेरुळ दरम्यान प्रवास करता येणार आहे.

Mega Block: रविवारी गरज असेल तरच बाहेर पडा! लोकल प्रवास होणार खडतर; मध्य- हार्बरवर मेगाब्लॉक, कधी आणि कुठे?
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक, बाहेर पडण्याआधी वेळापत्रक वाचाच

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com